tennis
tennis 
क्रीडा

डबल्स स्पेशालिस्टची एकेरीत निराशा 

मुकुंद पोतदार

पुणे : टेनिसच्या कोर्टवर डबल्स स्पेशालिस्ट एकेरीत धोकादायक ठरू शकतात. मुळात त्यांच्यादृष्टीने गमावण्यासारखे फार काही नसते. या पार्श्वभूमीवर टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत शनिवारी जे. विष्णू वर्धन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी पहिल्या लढतीत दवडणे निराशाजनक ठरले. 

बालाजीने अग्रमानांकित थियागो मॉंटीएरो, तर विष्णूने चौथ्या मानांकित कार्लोस टॅबर्नरविरुद्ध पहिला सेट जिंकला होता. या आघाडीनंतरही दोघे पराभूत झाले. या दोघांना दुहेरीचे वाईल्ड कार्ड मिळाले आहे. एकेरीच्या पात्रता फेरीतही त्यांना प्रवेश मिळाला होता.

पात्रता फेरीच्या पहिल्या दिवशी दोन सामन्यांत भारतीय आमनेसामने आले होते. त्यामुळे दोघांची आगेकूच नक्की होती. इतर चौघे मात्र पराभूत झाले. भारतीयांच्या लढतीत आठव्या मानांकित प्रज्ञेश गुणेश्वरनने स्थानिक खेळाडू जयेश पुंगलिया, तर सहाव्या मानांकित सुमीत नागलने वाइल्ड कार्ड मिळालेला डबल्स स्पेशालिस्ट दिवीज शरणला हरविले. 

रविवारच्या लढती 
ऍड्रियन वि. सुमीत, इल्या वि. कार्लोस, थियागो वि. प्रज्ञेश, जोओ वि. रिकार्डो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT