aus vs sl stand collapses storm watch video
aus vs sl stand collapses storm watch video  sakal
क्रीडा

आधीच आर्थिक संकट त्यात स्टेडियममधील स्टँड कोसळलं; लंकेत चाललंय तरी काय?

Kiran Mahanavar

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाले येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ चांगला झाला. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पाऊस आणि वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला. गाले येथे खराब हवामानामुळे सामना वेळेवर सुरू झाला नाही. श्रीलंकेतील वादळ आणि पावसाचा जोर इतका होता की स्टेडियमच एक स्टँड कोसळलं. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा स्टँडमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. (aus vs sl stand collapses storm watch video)

दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार होता. पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना आऊटफिल्ड झाकण्यासाठी खूपच मेहनत करावा लागला. वेळ वाया गेला असला तरी या सामन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 13 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे सामन्यात पुरेशी षटके टाकली तर निकाल येऊ शकतो.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर झुंजताना दिसले. श्रीलंकेचा संपूर्ण संघ २१२ धावांत गारद झाला. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज नॅथन लायनने 25 षटकांत 90 धावा देत 5 बळी घेतले. त्याचवेळी युवा लेगस्पिनर मिचेल स्वॅपसननेही लंकेच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कमिन्स आणि स्टार्क यांना 1-1 यश मिळाले. लंकेचा संघ ५९ षटकांत सर्वबाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 25 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेनही १३ धावा करून पुढे गेला. स्टीव्ह स्मिथ वैयक्तिक 6 धावांवर धावबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 98 अशी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT