Sri Lanka Women vs India Women 2nd T20I India Restrict Sri Lanka on 125 runs esakal
क्रीडा

INDW vs SLW : भारतासमोर लंकेचे 126 धावांचे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

दांबुला : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर 126 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेकडून सलामीवीर विशमी गुणरत्ने आणि चामरी आटापटू यांना 87 धावांची सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजांना 14 व्या षटकापर्यंत एकही यश मिळू दिले नाही. गुणरत्नेने 50 चेंडूत 45 धावांची तर आटापटूने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली. (Sri Lanka Women vs India Women 2nd T20I India Restrict Sri Lanka on 125 runs)

मात्र पूजा वस्त्राकरने आटापटूला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर हरमनप्रीत कौरने गुणरत्नेला 45 धावांवर बाद करत दोन्ही सेट झालेले फलंदाज माघारी धाडले. यानंतर भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मिळवण्यास सुरूवात केली. 17 षटकात 2 बाद 106 धावा करणाऱ्या श्रीलंकेची अवस्था भारताने 20 षटकात 7 बाद 125 अशी केली. आटापटू आणि गुणरत्ने बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. श्रीलंकेचे 126 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. शेफाली वर्मा 10 चेंडूत 17 धावा करून बाद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सकाळीच सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव

करण पडला प्राजक्ताच्या प्रेमात? बिग बॉसच्या घरात नक्की काय सुरुये? नेटकरी म्हणाले...'सगळे लव्ह अँगल...'

Mohammed Siraj: 'एक मिनिट भाई...', सिराज चाहत्यांच्या गराड्यात अडकला अन् मग चिडला; Video Viral

Bangladesh Election 2026 : बांगलादेशात कोणाचे सरकार ? २९९ जांगासाठी मतदान सुरु, मतदारांना का करावे लागतेय एकाच दिवशी दोनदा मतदान?

पोलीस की दलाल? मदत मागायला आलेल्या तरुणीला पाठवलं बुधवार पेठेत, पोलीस ठाण्यातच 'सौदा'; निलंबन अन् कोंम्बिग ऑपरेशनचा दिखावा

SCROLL FOR NEXT