Kabaddi Competition sakal
क्रीडा

Kabaddi Competition : पुण्यात राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा दम घुमणार; बालेवाडीत १३ ते २० जुलै दरम्यान रंगणार रंगत

पुण्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेचा दम घुमणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेचा दम घुमणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने तसेच बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन, बाणेर यांच्या वतीने वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १३ जुलै ते १६ जुलै २०२४ या दरम्यान; तर सतेज संघ बाणेर यांच्या वतीने वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १७ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, बाणेर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जाणारा कबड्डी दिन यावेळी ५ जुलै रोजी महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातच आयोजित केला जाणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेले २५ जिल्ह्यांचे महिला व पुरुष संघ तसेच अ व ब दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील ठाणे जिल्हा शहर व ग्रामीण, मुंबई शहर मध्य व पश्‍चिम, मुंबई उपनगर मध्य व पश्‍चिम, नाशिक जिल्हा शहर व ग्रामीण, पुणे जिल्हा शहर व ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर असे एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ही मॅटवर होणार आहे.

चार मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतींचा धमाका कबड्डीप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT