Steve Smith Got Angry After Buggy Camera
Steve Smith Got Angry After Buggy Camera esakal
क्रीडा

Video: लाहोर स्टेडियमधला फॉलो करणारा कॅमेरा पाहिला अन् स्टीव्ह स्मिथ भडकला

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) लाहोर येथे सुरू असलेल्या पाकिस्तान विरूद्धच्या (Pakistan vs Australia) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच जाम भडला. आधीच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 8 अशी केली होती. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी कांगारूंचा डाव कसाबसा सावरला होता. स्टीव्ह स्मिथ डोळ्यात तेल घालून फलंदाजी करत होता.

मात्र मैदानावरील बग्गी कॅमेरा (Buggy Camera) बरोबर स्मिथ फलंदाजी करत असतानाचा हालचाल करत होता. यावर स्टीव्ह स्मिथ जाम भडकला (Steve Smith Angry). त्याने चेंडू खेळल्या खेळल्या लेग अंपायरकडे याबाबत तक्रार केली. विशेष म्हणजे हा कॅमेरा गोलंदाजाच्या मागे नाही तर डीप मिडविकेटला होता. तरी या कॅमेऱ्याच्या हालचालीने स्टीव्ह स्मिथचे लक्ष विचलित होत होते. स्टीव्ह स्मिथ हा आपल्या चांगल्या आय साईडसाठी ओळखला जातो. त्याने याच जिवावर आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याने दोन डावात 78 आणि 72 अशा धावा केल्या आहेत. मात्र स्मिथला आपल्या या खेळी शतकात रूपांतरित करता आल्या नाहीत. आजच्या सामन्यातही त्याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि उस्मान ख्वाजाबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. मात्र त्याला आपल्या 59 धावांच्या खेळीचे शतकात रूपांतर करता आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT