IPL 2022: सनराजर्सच्या नट्टूची 'स्टंपतोड' गोलंदाजी होतेय व्हायरल

T. Natarajan Sunrisers Hyderabad Left Arm Fast Bowler Stump Broken Video
T. Natarajan Sunrisers Hyderabad Left Arm Fast Bowler Stump Broken Videoesakal

नवी दिल्ली: आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. हंगामातील साखळ फेरीतील सर्व सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. दरम्यान आयपीएलच्या 10 संघांनीही आपली तयारी सुरू केली असून विविध ठिकाणी आयपीएल संघांचे सराव शिबीर सुरू आहे. अनेक संघ आपल्या सराव शिबिराचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) नेट सेशन मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

T. Natarajan Sunrisers Hyderabad Left Arm Fast Bowler Stump Broken Video
खासदार झाल्यावर काय करणार? हरभजन सिंगनं सांगितला प्लॅन

सनराजर्स हैदराबादचा डावखुरा वेगावान गोलंदाज टी. नटराजन (T. Natarajan) आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी चांगलाच घाम गाळत आहे. याच नटराजन उर्फ नट्टूचा एक व्हिडिओ (Stump Broken Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टी नटराजनने आपल्या फिटनेसवर चांगले काम केल्याच्या दिसून येते. टी नटराजन यॉर्कर चेंडू टाकण्याचा सराव करत होता. यादरम्यान, त्याने टाकलेला एका वेगवान चेंडूमुळे स्टंपचे दोन तुकडे झाले.

T. Natarajan Sunrisers Hyderabad Left Arm Fast Bowler Stump Broken Video
IPL : पुरूषांच्या आयपीएलची 'पोस्टमार्टम' करणाऱ्या महिला अँकर्स

सन हैदराबादने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी 'ज्यावेळी हा ( टी. नटराजन) तुमचा पायाचा अंगठा चिरडत नसेल त्यावेळी तो तुमची स्टंप मोडत असेल.' नटराजनला दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडावे लागले होते. आता त्याने फिटनेसवर (Natarajan Fitness) भर दिला असून त्याच्या बॉडीकडे पाहून तो चांगली मेहनत करत आहे हे दिसत आहे. नटराजनने भारताकडून आतापर्यंत 1 कसोटी, 2 वनडे आणि 4 टी 20 सामने खेळले आहेत. तर आयपीएलमध्ये 24 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमध्ये 8.24 सरासरी राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com