खासदार झाल्यावर काय करणार? हरभजन सिंगनं सांगितला प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh

खासदार झाल्यावर काय करणार? हरभजन सिंगनं सांगितला प्लॅन

पंजाबमध्ये विरोधकांची बत्ती गुल्ल करणाऱ्या आम आदमी पार्टीनं ((Aam Aadmi Party)) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीये. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेल्या हरभजन सिंगचाही (Indian Former Cricketer Harbhajan Singh) या यादीत समावेश आहे. पंजाबमधील 7 पैकी 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिल 2022 रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेच्या या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. आपकडून हरभजन सिंगनही अर्ज भरला आहे. त्यानंतर हरभजनची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

क्रीडा क्षेत्राचा विकास करणे हेच माझ्यासमोरील ध्येय आहे. पंजाबमधील युवा क्रीडा क्षेत्राशी जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करेन. ऑलिम्पिकमध्ये 200 पदक मिळवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे देशभरात क्रिडा क्षेत्राला चालना देण्यासाठी जे काही करता येईल ते करेन, अशा शब्दांत हरभजनने आपला मानस बोलून दाखवलाय.

हेही वाचा: 'राजकारणातून मायावतींनी विश्रांती घ्यावी, आंबेडकरांचं स्वप्न RPI पूर्ण करेल'

पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकून विरोधकांच्या बत्या गुल्ल केल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीतही त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे हरभजन सिंग खासदार होणार हे जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा: Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!

पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपदाची जबाबदारी ही हरभजन सिंगकडे दिली जाऊ शकते. हरभजन सिंग शिवाय राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ संदीप पाठक, दिल्लीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या नावाचाही समावेश आहे.

Web Title: Punjab Rajya Sabha Seats My Focus Will Be On The Development Of Indian Former Cricketer Harbhajan Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top