Disha Kasat Cricket Journey
Disha Kasat Cricket Journey sakal
क्रीडा

गल्ली क्रिकेट ते चॅलेंजर ट्रॉफी ; दिशा कासटचा प्रेरणादायी प्रवास

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लहानपणी सोसायटीतील मुलांसोबत ती गल्ली क्रिकेट खेळायची. चेंडू जोरजोराने मारून शेजाऱ्यांच्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फोडायची. त्यामुळे अनेकवेळा शेजारी रागवायचे. पण तिने कधी मनावर घेतले नाही किंवा त्याची पर्वाही केली नाही. पुढे याच मुलीने क्रिकेटमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून आपल्या परिवारासह जिल्ह्यालाही नावलौकिक मिळवून दिला. (Disha Kasat Cricket Journey)

ती मुलगी आहे विदर्भाची अष्टपैलू क्रिकेटपटू दिशा कासट. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी जवळ असलेल्या सातेगावमध्ये जन्मलेल्या दिशाला लहानपणी मुलांसोबत खेळायला खूप आवडत. गावात सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमरावतीला मोठ्या आईकडे आली. दिशाची क्रिकेटमधील आवड लक्षात घेऊन मोठी आई तिला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात घेऊन गेली. तिथे प्रॅक्टिस करीत असतानाच क्रिकेट प्रशिक्षक दीनानाथ नवाथे यांच्या सल्ल्यानुसार ती अंडर १९ च्या ट्रायल्ससाठी नागपूरला आली. ट्रायल्समध्ये दिशाची मध्यमगती गोलंदाजी निवडकर्त्यांना आवडल्याने तिची २० खेळाडूंच्या कॅम्पमध्ये निवड झाली. शिबिरातही प्रभावी कामगिरी केल्याने तिचा विदर्भाच्या अंडर १९ संघात प्रवेश होऊन दिशाच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.(Disha Kasat News)

क्रिकेटमध्ये झेप घ्यायची असेल तर सोयीसुविधा असलेल्या मोठ्या शहरात येणे आवश्यक होते. त्यामुळे बारावीची परीक्षा आटोपताच दिशाने थेट नागपूर गाठले. १९ व २३ वर्षांखालील क्रिकेटमध्ये चमकदार प्रदर्शन करत ती अल्पावधीतच सीनियर संघात दाखल झाली. २४ वर्षीय दिशाने मागील तिन्ही सीझनमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले. २०१९-२० मधील तीन वनडेत ७९.८० च्या उत्कृष्ट सरासरीने २४१ धावा काढल्यानंतर २०-२१ मध्येही ६५.४८ च्या सरासरीने २०३ धावा फटकावल्या. नुकत्याच संपलेल्या सीझनमध्येदेखील तिची बॅट चांगलीच तळपली. ७९.५६ च्या सरासरीने एक शतक व दोन अर्धशतकांसह केवळ चार सामन्यांत २९२ धावा ठोकून तिने आपल्यातील टॅलेंट दाखवून दिले. घरगुती स्पर्धेतील या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दिशाची प्रतिष्ठेच्या चॅलेंजर स्पर्धेसाठी निवड झाली. दिशाने चॅलेंजर स्पर्धेतही इंडिया अ संघाकडून खेळताना अमिट छाप सोडली. दिशाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाकडून खेळण्याची इच्छा आहे. तिची झपाट्याने होत असलेली प्रगती लक्षात घेता, तिचे स्वप्न पूर्ण होईल, यात शंका नाही.

घरच्यांचा मिळाला सपोर्ट

जिल्हा व विभागीय स्तरावर व्हॉलिबॉल खेळलेल्या दिशाच्या यशात जेवढी मेहनत तिची स्वतः आहे, तितकेच योगदान घरच्यांचेही आहे. एकुलती एक मुलगी असूनही कृषी केंद्र चालविणाऱ्या वडिलांनी (दीपक कासट) आपल्या मुलीच्या आवडीनिवडी जपल्या. शिक्षण व खेळाच्या निमित्ताने तिला घराबाहेर पाठविले. ‘तुला जे योग्य वाटते ते तू कर’ असे ते नेहमीच दिशाला सांगत. बाबांसोबतच आई, आजी आणि मोठी आईही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिल्याचे एम. कॉम. शिकत असलेल्या दिशाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT