Sumit Nagal esakal
क्रीडा

Sumit Nagal : माझ्या बँक खात्यात फक्त 900 युरो... भारताचा अव्वल टेनिसपटू केंद्र सरकारवर का आहे नाराज?

अनिरुद्ध संकपाळ

Sumit Nagal : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलची आर्थिक परिस्थीत फार बिकट झाली आहे. त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी आपल्या बँकेत किती रक्कम शिल्लक राहिली आहे हे जाहीर करून टाकले. त्याच्या बँक खात्यात 900 युरोज म्हणजे एक लाखापेक्षाही कमी रक्कम शिल्लक राहिली आहे.

सुमित नागल गेल्या काही वर्षापासून जर्मनी येथील नानसेल टेनिस अकॅडमीत सराव करत आहे. मात्र तेथे सराव करणं त्याच्या दृष्टीने खूपच खर्चिक आणि तोट्याचा व्यवहार ठरत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

एशियन गेम्स खेळण्यासाठी सज्ज झालेल्या झालेल्या नागलने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'माझी सर्व प्राईज मनी एटीपी टूर्स खेळण्यासाठी गुंतवण्यात आली आहे. माझ्याकडे वर्षाच्या सुरूवातीला जेवढी रक्कम होती तेवढीच रक्कम शिल्लक राहिली आहे. माझ्याकडे जवळपास 900 युरो (साधारणपणे 80,000 रूपये) शिल्लक आहेत.'

'मला महा टेनिस फाउंडेशनच्या प्रशांत सुतार यांच्याकडून थोडी मदत मिळते. याचबरोबर मला आयओसीएल कडून देखील पगार मिळतो. मात्र माझ्याकडे मोठा स्पॉन्सर नाही.'

नागलने या वर्षी 24 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात त्याने जवळपास 65 लाख रूपये कमवले. त्याची युएस ओपनमधू सर्वाधिक कमाई झाली. तो युएस ओपनच्या पात्रता फेरीत पहिल्या राऊंडमध्ये पराभूत झाला. तरी त्याला 22000 युएस डॉलर (जवळपास 18 लाख रूपये) मिळाले.

नागल म्हणतो, 'मी जे काही कमवले ते सर्व ट्रेनिंगमध्येच गुंतवले. ज्यावेळी मी एका कोचसोबत वर्षभर ट्रॅव्हल करत असतो त्यावेळी मला जवळपास 80 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंत खर्च येतो. यात फिजिओचा समावेश नसतो. जे काही मी कमावलं आहे ते सर्व मी माझ्या ट्रेनिंगमध्ये गुंतवले आहे.

सुमित नागलने केंद्र सरकारवरही साधला निशाणा

सुमित नागल पुढे म्हणाला की, 'मला असं वाटतंय की मी गेल्या काही वर्षापासून भारताचा क्रमांक एकचा टेनिसपटू असूनही मला फार कमी पाठिंबा मिळतोय. भारताचा मी एकमेव खेळाडू आहे जो ग्रँडस्लॅमसाठी पात्र होतोय. गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकमध्ये टेनिस सामना जिंकणारा मी एकमेव खेळाडू आहे. तरी देखील सरकारने माझा समावेश TOPS स्कीममध्ये केलेला नाही.'

'मला वाटते की ज्यावेळी मला दुखापत झाली आणि माझे रँकिंग खाली आले तेव्हापासून मला कोणीही मदत करू इच्छित नाही. मी जे काही करतोय ते पुरेसं नाही. भारतात आर्थिक मदत मिळणं खूप कठिण आहे. मला माहिती नाही की मी काय करून मी आता हताश झालो आहे.'

भारतीय टेनिसपटूंनी व्यावसायिक स्तरावर एकेरीमध्ये खेळणे खरंच व्यावहारिक पर्याय आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर नागल म्हणाला, 'माझी बचत अशी काही नाही. मी जेवढं कमवतोय तेवढा खर्चही होतोय. चांगलं आयुष्य जगतोय असं मी म्हणू शकत नाही.'

'मला आता काम करण्याची गरज नाही असं मी म्हणू शकत नाही. मी गेल्या दोन वर्षापासून काहीही कमवून ठेवलं नाही. त्यामुळं मी निदान तोट्यात नाही, माला अकॅडमी सोडून स्वतःचं स्वतः पाहावं लागत नाही यातच आनंद आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT