Sunil Chhetri Announces Wife Sonams Pregnancy  esakal
क्रीडा

Sunil Chhetri Goal : एकमेव गोल, भारत फायनलमध्ये अन् तो VIDEO; छेत्री अनोख्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Chhetri Announces Wife Sonams Pregnancy : भारतीय फुटबॉल संघाने सोमवारी इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. भारतीय संघाने भुवनेश्वर मधील कलिंगा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या वनुआतू विरूद्धच्या सामन्यात 1 - 0 असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचे फायनलचे तिकीट पक्के झाले.

भारताने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले होते. मात्र रँकिंगमध्ये 164 व्या स्थानावर असलेल्या वनाआतूने चांगला बचाव करत भारतीय स्ट्रायकर्सना रोखून धरले होते. मात्र अनुभवी सुनिल छेत्रीने शुभाशीष बोसच्या पासवर 81 व्या मिनिटाला हा बचाव भेदत भारताचा पहिला गोल केला.

सुनिल छेत्रीने दिली गुडन्यूज

जागतिक फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत सुनिल छेत्री तिसऱ्या स्थावावर आहे. वनुआतू विरूद्धच्या एकमेव गोलनंतर सेलिब्रेशन करताना छेत्रीने आपण बाप होणार असल्याची घोषणा केली. त्याने फुटबॉल आपल्या टीशर्टमध्ये ठेवला अन् आपल्या गर्भवती पत्नीला हा गोल समर्पित केला. यावेळी सुनिल छेत्रीची पत्नी सोनमने टाळ्या वाजवून सुनिलचा उत्साह वाढवला.

सामन्यानंतर सुनिल छेत्रीने आपल्या या अनोख्या सेलिब्रेशनबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, 'माझी पत्नी गर्भवती आहे. तिची इच्छा होती की मी ही गुडन्यूज सर्वांशी शेअऱ करावी. आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा हव्या आहेत.'

भारताचे निर्विवाद वर्चस्व

भारताने शुक्रवारी झालेल्या सामन्यात मंगोलियाचा 2 - 0 असा पराभव केला होता. भारताने दोन गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ गुरूवारी आपला अखेरचा राऊंड रॉबिन सामना खेळणार आहे. जागतिक क्रमवारीत 101 व्या स्थानावर असलेल्या भारताने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व राखले.

सुरूवातीच्या हाफमध्ये 62 टक्के चेंडूचा ताबा भारताकडे होता. यात भारताने 13 गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. वनुआतूला संपूर्ण सामन्यात भारतीय गोलपोस्टवर एकही आक्रमण करण्याची संधी मिळाली नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT