Sunil Gavaskar On Virat Kohli Esakal
क्रीडा

Sunil Gavaskar On Virat Kohli : अर्धशतकाच्या त्या एका धावेसाठी... गावसकर विराटवर जाम भडकले

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar On Virat Kohli : जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात (WTC Final) ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात भारतासमोर 444 धावांचे मोठं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करण्यासाठी भारताकडे चौथ्या दिवसाचे एक सत्र आणि पाचव्या दिवसाची तीन सत्रं होतीत. भारताने दमदार सुरूवात केली मात्र रनरेटच्या मोहापायी रोहित आणि पुजारा चुकीचा फटका मारून बाद झाला. त्यामुळे सर्व भिस्त विराट कोहलीवरच होती. त्याच्या साथीला अजिंक्य रहाणे देखील होता.

चौथ्या दिवशी या दोघांनी भारताला 167 धावांपर्यंत पोहचवले होते. त्यामुळे पाचव्या दिवशी हे दोघे चमत्कार करतील असे वाटत होते. मात्र विराट कोहली 49 धावांवर पोहचला असताना पुन्हा सहाव्या स्टम्पवरील चेंडूत खेळण्याच्या नादात झेलबाद झाला अन् भारताची फलंदाजी कोसळण्यास सुरूवात झाली. विराटच्या या एकाच पद्धतीने सातत्यापूर्ण बाद होणाऱ्यावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी टीका केली.

गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, 'विराट बाद झाला तो अत्यंत साधारण फटका होता. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू.. हा चेंडू तो आधी सोडत होता. मला असं वाटतं की कदाचित तो अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्या एक धावेचा विचार करत असावा. तुम्ही ज्यावेळी अर्धशतकाच्या, शतकाच्या जवळ असता त्यावेळी असं होतं.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'हे जडेजाच्या बाबतीत देखील झाले. त्याने देखील 48 धावांवर असताना जो फटका खेळायचा नव्हता तो खेळला. अजिंक्य रहाणे 46 धावांवर होता. त्याने यापूर्वी बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र अचानक त्याने तो खेळला. कारण त्याला आपण लँडमार्कच्या जवळ आहोत याची जाणीव होती.'

विराट कोहलीच्या फटक्यांची निवडीवर टीका करताना गावसकर म्हणाले की, 'तो एक खराब फटका होता. तुम्ही विराटला या फटक्याबद्दल विचारणा झाली पाहिजे. तो सामना कसा जिंकायसाठी कशी मोठी खेळी करणे गरजेचे आहे याबाबत कायम बडबडत असतो. तुम्ही असं कसं करू शकता. तुम्ही एवढ्या बाहेरचा चेंडू कसा खेळू शकता?'

ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात 70 धावात 7 फलंदाज बाद केले. पाचव्या दिवशी उपहारापूर्वीच भारताचा दुसरा डाव 234 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा पटकावली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

Pune News : बेपत्ता दोन मुली सुखरूप सापडल्या; पाचशे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT