IND vs WI 3rd T20 Suryakumar Yadav: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना एक षटक शिल्लक असताना सात विकेट राखून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या सूर्यकुमारने टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून दिला. तुफानी खेळी खेळत सूर्यकुमार आपल्या जिवलग मित्रासाठी विलेन ठरला आहे.
सूर्यकुमार यादवची आतापर्यंत वेस्ट इंडिज दौऱ्यात काही खास करू शकला नव्हता, मात्र या सामन्यात त्याने धमाकेदार इनिंग खेळून पुनरागमनाचे संकेत दिले. सूर्यकुमार यादवला या मालिकेत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा फायदा घेत त्याने आपलाच मित्र इशान किशनसाठी टेन्शन वाढवले आहे. इशान किशन हा सलामीचा फलंदाज असून तो या मालिकेत डावाची सलामी देण्याचा मोठा दावेदार होता. मात्र सूर्यकुमारच्या या खेळीनंतर त्याला संघात स्थान मिळणे कठीण होणार आहे.
सूर्यकुमार यादवला पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त एकूण 35 धावा करता आल्या, त्यानंतर त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र या सामन्यात त्याने 172.72 च्या स्ट्राइक रेटने 44 चेंडूत चौकार आणि चार षटकार मारत 76 धावांची खेळी करत चोख प्रत्युत्तर दिले. सूर्यकुमार आणि इशान किशन आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतात आणि त्यांना चांगले मित्रही मानले जाते, मात्र येथे सूर्यकुमार त्यांच्यासाठी मोठा धोका ठरत आहे.
इशान किशनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 18 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, इशान किशनने भारताकडून 3 वनडे खेळताना 29.33 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत. इशान किशन अनेक प्रसंगी टीम इंडियाकडून सलामीवीर म्हणून खेळला आहे. आयपीएल 2022 नंतर त्याला सलामीवीर संघात अनेक सामने खेळायला मिळाले आणि त्याने चांगली कामगिरीही केली. भारतीय संघाला याच महिन्यात आशिया चषकही खेळायचा आहे, त्यामुळे इशान किशनला संघात स्थान मिळणे मोठे आव्हान असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.