suryakumar yadav sakal
क्रीडा

Video : टीम इंडियासाठी सूर्या पहाटे 3 वाजताच 'उगवला होता', आजारी असतानाही...

मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमारने पहाटे 3 वाजता काय झाले यांचा केला खुलासा...

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. यासोबतच टीम इंडियाने मालिकाही 2-1 ने जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने चार गडी गमावून एक चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग केला. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीचा मोठा वाटा होता.

मालिकेतील निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावा केल्या. सूर्यकुमारने रात्रभर गोंधळ घातला. टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये सूर्यकुमारने दुपारी ३ वाजता गोंधळ घातला होता. सूर्याला काय झाले आहे. मालिका जिंकल्यानंतर त्यानेच याचा खुलासा केला.

सूर्यकुमार सामनावीर ठरला तर अक्षर पटेल मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमारने अक्षरशी बोलताना रात्री 3 वाजता काय झाले यांचा खुलासा केला. बीसीसीआयने त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. अक्षरने सांगितले की, तो सकाळी उठून फिजिओ रूममध्ये गेला आणि तिथे काय गोंधळ झाला. पहाटे 3 वाजता उठल्यावर सर्वजण सूर्यकुमारबद्दल बोलत होते. अक्षराचे म्हणणे ऐकून सुर्याने सगळा प्रकार सांगितला.

सूर्यकुमार सांगितले की, हवामान बदलले असून प्रवासही सुरू आहे. त्यामुळे पोटदुखी सुरू झाली आणि तापही आला, पण हा सामना निर्णायक होता. अशा परिस्थितीत फिजिओ आणि डॉक्टरांना सांगितले की जर विश्वचषकाची फायनल असेल तर त्यावेळी काय केले असते. म्हणूनच मी तो आजार घेऊन बसू शकत नाही. तुम्हीला कोणतेही इंजेक्शन द्यावे लागले किंवा कोणतीही गोळी घ्यावी लागली तरी द्या संध्याकाळच्या सामन्यासाठी मला बंर करा. भारताने तिसरा सामना 6 गडी राखून जिंकला आणि यासह मालिका 2-1 ने जिंकली. सूर्यकुमारने सर्वाधिक धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT