Team India Squad T20 WC sakal
क्रीडा

Team India Squad T20 WC : टीम इंडियाच्या निवडीवर ऑस्ट्रेलियानं उपस्थित केला प्रश्न

16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 WC : 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 15 जणांच्या संघात भारताने भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह या चार वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. त्याचबरोबर अनुभवी मोहम्मद शमीला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाच्या निवडीबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने वक्तव्य केले आहे.

मिचेल जॉन्सनने पीटीआयला सांगितले की, तुम्ही एक वेगवान अष्टपैलू, दोन फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांना संघात ठेवले आहे हे थोडे धोक्याचे आहे. पण भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पांड्या) आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा विचार तुम्ही करत आहे.

ऑस्ट्रेलियात तुम्हाला संघात तीन वेगवान गोलंदाज ठेवावे लागतात. पर्थच्या परिस्थितीत चार वेगवान गोलंदाजांना संघात सामील करावे लागेल. मला वाटते की त्यांनी संघाची योजना आखून निवड केली आहे, परंतु केवळ चार वेगवान गोलंदाजांसह ते धोकादायक ठरू शकते. अजून एखाद्या वेगवान गोलंदाज संघात असणे आवश्यक होते.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT