“Captain Suryakumar Yadav reacts to the T20 World Cup 2026 schedule and predicts India’s appearance in the final match.”
esakal
Suryakumar Yadav’s Bold Prediction on Final Match : पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक आज (मंगळवार) जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि ८ मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून, ते पाच गटात विभागले गेले आहेत.
अपेक्षेनुसार भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत आणि १५ फेब्रुवारी रोजी एकमेकांशी या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघाचा आमनासामना होणार आहे. तर, या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच भारतीय टी २० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या विश्वचषकातील अंतिम सामन्याबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या दोन संघात होईल, हे सूर्याने सांगितलं आहे.
जतिन सप्रूने सूर्यकुमार यादवला अंतिम सामन्याबद्दल विचारले असता, सूर्याने सांगितले की अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल आणि तो टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया या संघात होईल. तर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही सूर्याच्या या भाकिताचे समर्थन केले आहे.
तर, याच प्रश्नावर या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा म्हणाला की, फायनल मॅचमध्ये भारतीय संघाचा सामना कुणाशी होईल, हे महत्त्वाचे नाही. मला फक्त भारतीय संघाने हे विजेतेपद जिंकावे असे वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.