Ireland vs Netherlands  Sakal
क्रीडा

Video : यशस्वी रिव्ह्यूसह टी-20 वर्ल्ड कपमधील पहिली हॅटट्रिक

ब्रेटली नंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी हॅटट्रिक आहे.

सुशांत जाधव

Ireland vs Netherlands, 3rd Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अ गटातील आयर्लंड आणि नेदरलंड यांच्यातील सामन्यात पहिल्या हॅटट्रिकची नोंद झाली. आयर्लंडच्या कुर्टीस कँफरने (Curtis Campher ) 10 व्या षटकात चार चेंडूत चार विकेट घेतल्या. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ब्रेटली नंतर ही दुसरी हॅटट्रिक आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या हंगामात ब्रेट लीने हॅटट्रिक नोंदवली होती. कँफरने पहिल्या षटकात 12 धावा दिल्या तो चांगलाच महागडा ठरला. पण आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने दमदार कमबॅक केले.

नेदरलंडच्या डावातील 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कँफरने 11 धावांवर खेळणाऱ्या कॉलिन आकेरेमान याला नील रॉककरवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या रियना टेकला त्याने आल्यापावली माघारी धाडले.स्कॉट एडवर्ड्सच्या पायचितसाठी त्याने जोरदार अपील केले. पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर आयर्लंड कर्णधाराने रिव्ह्यू घेतला. त्याचा हा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रिकची नोंद झाली. चौथ्या चेंडूवरही त्याने मेर्वेला बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT