Not Too Happy With My Fifty Rohit Sharma sakal
क्रीडा

Ind vs Ban: 'रोहित येतो फक्त भूमीपूजन करुन जातो'! मीम्स व्हायरल

रोहितनं दुबळ्या नेदरलँड वगळता कोणत्याही संघाविरोधात चांगली फलंदाजी केल्याचे दिसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपवर भारत आपले नाव कोरणार अशी आशा प्रेक्षकांना वाटू लागली आहे. मात्र आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानं भारताचा प्रवास आणखी खडतर झाला आहे. यासगळ्यात सध्या भारतीय संघातील काही निवडक खेळाडूच प्रभावी कामगिरी करताना दिसत आहे यावरुन नेटकऱ्यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर सडकून टीका केली आहे.

जगातील प्रभावी फलंदाजांमध्ये रोहित शर्माचे नाव घेतले जाते. मात्र सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी कमालीची ढिसाळ होताना दिसते आहे. आतापर्यत भारताचे चार सामने झाले आहेत. मात्र रोहितनं दुबळ्या नेदरलँड वगळता कोणत्याही संघाविरोधात चांगली फलंदाजी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. आणि त्यांनी त्याची सोशल मीडियावर धुलाई केली आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या शेलक्या प्रतिक्रिया देणारे मीम्स आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

रोहित तू मैदानात फक्त भूमीपुजनापुरताच येतो. बाकी काही नाही.... तर दुसऱ्यानं रोहित एकदा का होईना चांगली बॅटिंग कर...अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन आपला राग व्यक्त केला आहे. सुर्यकुमार आणि विराट हेच चांगली कामगिरी करतात तर रोहित आणि केएल फक्त भूमीपुजनाला येतात. अशीही खोचक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. चाहत्यांना रोहितकडून खूप अपेक्षा आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून मोठ्या कामगिरीकडे डोळे लावून बसले आहेत.

सध्याच्या वर्ल्डकपमध्ये रोहितनं चमकदार कामगिरी करावी म्हणून नेटकरी डोळे लावून बसले असताना तो मात्र सातत्यानं अपयशी होताना दिसतो आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील त्याच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: जीवनाचं चक्र पूर्ण...! सचिनचा लॉर्ड्सवर ENG vs IND कसोटीदरम्यान अनोखा सन्मान; पाहा फोटो

Vasmat Accident : ऑटो व बसची समोरासमोर धडक; दोन महिलांचा मृत्यू, एका महिलेची प्रकृती गंभीर

Latest Maharashtra News Updates : विधीमंडळात आमदारांना धक्काबुक्की

Mumbai Goa Highway: रस्त्यांना तडे अन् जागोजागी खड्डे, मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था, ठाकरे गटाकडून पोलखोल

Nashik News : कामगार मोर्च्यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गही फसले

SCROLL FOR NEXT