Shakib Al Hasan  Sakal
क्रीडा

मलिंगाचा विक्रम मोडला; शाकिब टी-20 चा नवा बादशहा!

मलिंगाचा विक्रम मागे टाकत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

सुशांत जाधव

Shakib Al Hasan created history : वर्ल्ड कप स्पर्धेतील स्कॉटलंड विरुद्धच्या सलामीच्या लढतीत बांगलादेशच्या शाकिब अल हसनने खास विक्रमाला गवसणी घातली. आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा लसिथ मलिंगाचा विक्रम मागे टाकत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. 84 सामन्यात मलिंगाने 107 विकेट घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी होती. हा पल्ला सर करुन शाकिबनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्कॉटलंडच्या डावातील 11 व्या षटकात शाकिबनं दोन विकेट घेत मलिंगाच्या विक्रम मागे टाकला. आता आंतरारष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजीत तो अव्वलस्थानी आहे. 89 सामन्यात त्याने हा पराक्रम करुन दाखवला असून 20 धावा खर्च करुन 5 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारा शाकिब एकमेव क्रिकेटर आहे. शाकिबने 2006 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले होते. त्याचा हा सातवा टी-20 वर्ल्ड कप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

Alandi Weddings : गुरू-शुक्राच्या अस्तामुळे आळंदीत विवाह मुहूर्त कमी, कार्यालय बुकिंगला थंड प्रतिसाद

SCROLL FOR NEXT