Afghanistan Cricket esakal
क्रीडा

Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटपटूंना तालिबानी फतवा; तीन खेळाडूंचा करार रद्द, IPL समावेशालाही ग्रहण

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयपीएल संघांच वाढवलं टेन्शन, महत्वाच्या खेळाडूंवरच....

अनिरुद्ध संकपाळ

Afghanistan Cricket : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे अफगाणिस्तानच्या तीन खेळाडूंच्या आयपीएल सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थिती झालं आहे. मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फजलहक फारूकीला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पुढचे दोन वर्षे ना हरक प्रमाणपत्र देण्याची शक्यता नाही. यामुळे त्यांचे आयपीएल 2024 हंगाम खेळण्याची शक्यता देखील धुसर झाली आहे.

एसीबीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुजीब, नवीन आणि फजलहक यांच्या वार्षिक करार वाढवण्यास स्थगिती दिली आहे. एसीबीने या तीन खेळाडूंनी वैयक्तिक लाभाला जास्त प्राधान्य दिल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी होणार आहे असे सांगितले.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या वेबसाईटवर एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यात लिहिलं आहे की, 'वरील खेळाडूंनी केंद्रीय करारावर स्वाक्षरी न करणे, व्यावसायिक लीग स्पर्धेत त्यांचा सहभाग, अफगाणिस्तानकडून खेळण्यापेक्षा व्यक्तिगत हितांना प्राथमिकता देणे, अफगाणिस्तानकडून खेळणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या खेळाडूंविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

या प्रकरणी संपूर्ण तपास करून एसीबीच्या हितांनुसार शिफारस करणे आणि याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी एक समिती स्थानप करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानचा संघ भारताविरूद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. संघ सध्या याचीच तयारी करत आहे. मालिकेतील पहिला सामना हा 11 जानेवारीला मोहालीत, दुसरा सामना हा 14 जानेवारीला इंदौर आणि तिसरा 17 जानेवारीला बंगळुरू येथे होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar Instagram post : उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपला VSR कंपनीचा मालक ; जय पवार यांनी शेअर केला व्हिडिओ

Maharashtra Board Exam Fraud : अंजनगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक; परीक्षा कस्टडी रूमवर आढळला गैरप्रकार, शिक्षण विस्तार अधिकारी फरार

Nagpur Factory Blast : उद्याची स्वप्ने स्फोटाने केली उद्ध्वस्त! नाईट शिफ्टवरून परतताच पत्नी गेल्याची बातमी मिळाली अन्...

Taliban Airstrikes on Pakistan : रावळपिंडी ते क्वेटा, तालिबानने उद्धवस्त केले पाकचे लष्करी तळ, एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर

महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर ! ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून मांडणार मुंबईतील तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष

SCROLL FOR NEXT