Team India 
क्रीडा

Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी; Video

India Finally Arrives Home: मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकून टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात दाखल झाली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकून टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चाहत्यांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ एएनआयकडून शेअर करण्यात आले आहेत.

टीम इंडिया आधी दिल्लीमधील ITC मोर्य हॉटेलमध्ये जाईल. याठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी त्याच्यासाठी जेवणाची मेजवाणी ठेवण्यात आली आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाची भेट घेणार आहेत. मोदी त्यांचे कौतुक करतील. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास टीम इंडिया मुंबईला रवाना होईल.

मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. आधी टीम इंडियाचे नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात चाहते उपस्थित राहणार आहेत. ओपन बसमधून ही रॅली असणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडीयमवर टीम इंडियाला १२५ कोटींचा धनादेश देण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या विजयानतर बीबीसीआयने हे बक्षीस जाहीर केले होते.

चार दिवसानंतर आगमन

गेले चार दिवस टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. याठिकाणी आलेल्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे टीम इंडियाला आपल्या रुमच्या बाहेर येणे देखील कठीण झाले होते. अखेर टीम इंडियाचा मायदेशी येण्याचा मुहूर्त लागला. एअर इंडियाचे चार्टड फ्लाईट टीम इंडियाला घेण्यासाठी गेले होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारस हे विमान दिल्ली विमानतळावर उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT