वेस्ट इंडीज विरुद्धची वनडे मालिका टीम इंडियासाठी (Team India) खास असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ हजारी वनडे सामने (Indias 1000th ODI Match) खेळण्याचा आकडा गाठेल. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होईल. हा मैलाचा टप्पा गाठणारी टीम इंडिया पहिली टीम ठरेल.
रविवारी होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यापूर्वी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासह संपूर्ण देशासाठी हा क्षण खास असेल. 1974 मध्ये पहिला वनडे सामना खेळणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) इथपर्यंतचा प्रवास हा अविस्मरणीय आहे. आतापर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले क्रिकेटर, विद्यमान क्रिकेटर्ससह आजी-माजी क्रिकेट बोर्डातील सदस्यांचे यात मोठे योगदान आहे, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. या प्रवासात भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना विसरुन चालणार नाही, असा खास उल्लेखही त्याने केला आहे. आपल्या 100 MB App च्या माध्यमातून सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या प्रवासावर भाष्य केले. भारतीय संघ पुढेही जोमाने दमदार कामगिरी करत राहिल, असा विश्वास व्यक्त करत त्याने संघातील खेळाडूंना वेस्ट इंडीज विरुद्धच्या स्पेशल सामन्यासह मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाने आतापर्यंत 999 वनडे सामने खेळले आहेत. यातील 518 सामन्यात संघाला विजय मिळाला आहे. 431 सामने संघाने गमावले आहेत. 9 सामने बरोबरीत सुटले असून 41 सामन्यांचा निकालच लागला नाही. भारतीय संघाने 2002 मध्ये 500 वा वनडे सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ तीन संघांनी 900 हून अधिक वनडे सामने खेळले आहेत. यात भारत 999, ऑस्ट्रेलिया 958 आणि पाकिस्तान 936 सामन्यांचा समावेश आहे.
सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा आणि त्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 44.48 च्या सरासरीने 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंकेच्या जयवर्धनेचा नंबर लागतो. त्याने 448 सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. सनथ जयसूर्या 445, कुमारा संगकारा यांच्या नावे 404 वनडे खेळण्याचा विक्रम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.