Shardul Thakur At Number 5 In ODI World Cup Rohit Sharma Reveals Strategy 
क्रीडा

Team India : 'शार्दुल ठाकुर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार...' कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

Kiran Mahanavar

Team India World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने बांगलादेशचा पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुण्यात खेळला गेला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. तर विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले, आणि केएल राहुलने त्याला चांगली साथ दिली.

मात्र, सामन्यानंतर कर्णधार रोहितने मोठा खुलासा केला आहे. शार्दुल ठाकूरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाणार असल्याचे त्याने म्हटले. मात्र, काही कारणामुळे हा प्लॅन रद्द झाला.

सामन्यानंतर रोहितने खुलासा केला की, श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर मी शार्दुलला तयार होण्यास सांगितले होते. पण श्रेयस अय्यर आऊट झाला आणि शार्दुल तयार होऊन खाली येत होता, तितक्यात केएल राहुल फलंदाजीला गेला होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने शुभमन गिलला या गोष्टी सांगितल्या. यावर शुभमन म्हणाला की, चाहते शार्दुलची फलंदाजी पाहण्यासाठी वाट पाहत होते, यावर रोहितने मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला- त्याला संधी मिळेल. तो मोठ्या सामन्यांमध्ये खेळणारा खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT