team india squad announced for icc men u19 world cup 2024 cricket news in marathi
team india squad announced for icc men u19 world cup 2024 cricket news in marathi 
क्रीडा

Team India Squad U19 WC 24 : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! 'या' खेळाडूकडे संघाची धूरा

Kiran Mahanavar

Team India Squad announced for ICC Men U19 World Cup 2024 : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2024 यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळला जाणार आहे. याआधी तो श्रीलंकेत होणार होता, परंतु आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यजमानपद मिळाले.

आता BCCI अंडर-19 वर्ल्ड कप 2024 आणि तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. जो संघ अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. तो संघ प्रथम दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेत खेळणार आहे, जेणेकरून वर्ल्ड कपची तयारी अधिक मजबूत करता येईल.

उदय सहारन यांच्याकडे 2024 च्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. तर सौम्य कुमार पांडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 15 खेळाडूंशिवाय चार बॅकअप खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. तिरंगी मालिकेसाठी तीन खेळाडूंना प्रवासी राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रेम देवकर, अंश गोसाई आणि मोहम्मद अमान यांचा समावेश आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शीन, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला.

मागचे खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT