team india squad for the asian games 
क्रीडा

Team India Squad : संघ निवडीनंतर BCCI ने अचानक केला मोठा बदल! टीम इंडियातून 'हे' खेळाडू बाहेर

Kiran Mahanavar

Team India Squad for The Asian Games : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी 16 सप्टेंबरला आशियाई क्रीडा हँगझोऊ 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांमध्ये मोठे बदल केले आहेत. झेजियांग यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फील्ड येथे 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, "पुरुष निवड समितीने आशियाई क्रीडा स्पर्धा हँगझोऊ 2022 साठी भारतीय संघात शिवम मावीच्या जागी आकाश दीपचा समावेश केला आहे. मावी पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून तो स्पर्धेतून बाहेर आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे.

दरम्यान, महिला टीममध्ये पूजा वस्त्राकरची निवड केली आहे, ती अंजली सरवानीच्या जागी संघात आली, जी यापूर्वी खेळाडूंच्या स्टँडबाय यादीचा भाग होती. डावखुरी वेगवान गोलंदाज सरवानीला गुडघ्याला दुखापत झाली असून ती स्पर्धेबाहेर गेली. महिला क्रिकेट स्पर्धा 19 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), आकाश दीप.

  • खेळाडूंची स्टँडबाय यादी : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (व्हीसी), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर.

  • खेळाडूंची स्टँडबाय यादी : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT