Rohit Sharma and Sourav Ganguly Sakal
क्रीडा

Sourav Ganguly : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये विश्‍वविजेता बनण्याची क्षमता - सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता ­­: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या टीम इंडियाचे कौतुक केले आहे. गांगुली यांनी याप्रसंगी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी-२० विश्‍वकरंडकावर नाव कोरेल आणि मागील ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धा अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

सौरव गांगुली पुढे म्हणाले, मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. विराटला नेतृत्वपद नको होते. रोहितला कर्णधारपदासाठी राजी करण्यास उशीर लागला,

पण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचा अभिमान वाटतो. मार्च ते मे या कालावधीत पार पडलेल्या आयपीएलमध्ये त्याच्याकडे मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्वही नव्हते. आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अपराजित राहून अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली आहे. याचा आनंद आहे.

आयपीएलची पाच जेतेपदे

सौरव गांगुली पुढे सांगतात की, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेता होण्याचा मान संपादन केला आहे. आयपीएलमध्ये किमान १६ ते १७ लढती खेळाव्या लागतात. त्यानंतर अजिंक्य होता येते. विश्‍वकरंडकात आठ ते नऊ लढतींनंतर विजेता होता येते. त्यामुळे आयपीएलचे जेतेपद हे आव्हानात्मक असते, मात्र विश्‍वकरंडकाचे जेतेपद आयपीएलपेक्षा अधिक अभिमानास्पद, गौरवास्पद असते.

... तर तो बार्बाडोसच्या महासागरात डुबेल

सौरव गांगुली यांनी पुढे नमूद केले की, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. आताही रोहितच्याच नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

सहा ते सात महिन्यांमध्ये भारतीय संघ दोन विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दोन्ही अंतिम सामने पराभूत झाल्यास रोहित बार्बाडोसच्या महासागरात डुबेल. भारतीय संघ आपली चमकदार कामगिरी उद्याही कायम ठेवील, असा विश्‍वासही त्यांच्याकडून पुढे व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT