Aishwarya Jadhav
Aishwarya Jadhav Sakal
क्रीडा

प्रशिक्षक, कोल्हापूरकरांमुळे विम्बल्डनपर्यंतची झेप

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रशिक्षक अर्शद व मनाला देसाई यांची मिळालेली खंबीर साथ आणि दातृत्वात कधीही मागे न पडणारे कोल्हापूरकर यामुळे विम्बल्डनपर्यंत धडक देता आली, अशी भावना टेनिसपटू ऐश्वर्या जाधवने आज व्यक्त केली. ती विम्बल्डनमधील १४ वयोगटातून खेळून नुकतीच परतली. जागतिक पातळीवर तिला मोठे यश मिळाले नसले तरी मोठा अनुभव तिच्या पाठीशी आला आहे.

टेनिस कोर्टवर पाय ठेवल्यापासून आव्हाने पेलणार ऐश्वर्याने विम्बल्डन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वसामान्य कुटुंबातील ऐश्वर्या जिद्दीने खेळली. ती १४ वर्षांखाली गटामध्ये देशात अग्र मानांकित आहे, तर १६ वर्षांखालील गटात तिसऱ्यास्थानी आहे. ती म्हणते, विम्बल्डनमुळे नेमके कुठे आहोत, हे समजायला मदत झाली. विजय मिळवता आला नसला तरीही आयुष्यभराची शिदोरी मिळाली. विम्बल्डनमध्ये सहभागी होणारी ऐश्वर्या ही पहिली कोल्हापूरची खेळाडू आहे. स्पर्धेतील चार सामन्यात ती अपयशी ठरली तरी तिची जिद्द आणि परिश्रमाची तयारी वाढली आहे.

ती म्हणते, ‘‘तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याचे सर्वात मोठे आव्हान होते. क्ले कोर्टचा अधिक सराव होता. तेथे लॉनवर खेळताना परिस्थिती विपरीत होती. यातही तयारीला कमी वेळ मिळाला. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूविरुद्धच्या तिने चमकदार कामगिरी केली; मात्र परदेशातील पहिल्याच स्पर्धेचे दडपण कायम राहिल्याने निसटता पराभव झाला, पण टेनिस कल्चर काय आहे, हे समजले. परदेशी खेळाडूंची तयारी तांत्रिक असते. सुविधांमध्येही खूप तफावत आहे. त्यात निम्म्याने सुधारणा झाल्यास यश अधिक जवळ येईल.’’

दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांनी ऐश्वर्याची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. तिचा विम्बल्डनचा अनुभव जाणून घेतला. भविष्यात शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

खूप प्रेम मिळाले

इंग्लडमध्ये अनेक भारतीय भेटले. त्यांनी खूप प्रेम दिले. मी १३ वर्षांची तेथे असल्याचे समजताच प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गर्दी केली. त्यांनी शुभेच्छा दिल्या. हे सर्व छान वाटत असताना त्यांच्यासाठी जिंकू न शकल्याने उदासही झाले, असे ती सांगते.

विजयाची गुरुदक्षिणा देईन

या जडणघडणीमध्ये आई-वडील, तसेच प्रशिक्षक यांचे मोठे योगदान आहे. दोन्ही प्रशिक्षकाशिवाय हे शक्य नव्हते. यंदाच्या वर्षी विम्बल्डनचा सहभाग माझ्याकडून त्यांना गुरुदक्षिणा असणार आहे. पुढच्या वर्षी विजयाची गुरुदक्षिणा देईन, असे ऐश्वर्या म्हणाली.

भरगच्च दौरा

ऐश्वर्या आज संध्याकाळी मुंबईला रवाना होत आहे. तेथून ती (ता. १८) फ्रान्स, ता. २६ ला जर्मनीत स्पर्धेसाठी दाखल होत आहे. त्यानंतर ती १ ते १० ऑगस्ट दरम्यान झेक रिपब्लिक येथील स्पर्धेत सहभागी होणार आहे. झेक रिपब्लिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ऐश्वर्या भारतीय संघाची कर्णधार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT