Nadal-Djokovic face off  sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस स्पर्धेत नदाल-जोकोविच दुसऱ्याच फेरीत आमने-सामने

पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस या खेळाच्या स्पर्धेमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. याच पार्श्वभूमीवर टेनिसप्रेमींना अव्वल दर्जाचा खेळ याप्रसंगी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस या खेळाच्या स्पर्धेमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. याच पार्श्वभूमीवर टेनिसप्रेमींना अव्वल दर्जाचा खेळ याप्रसंगी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व माजी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता राफेल नदाल हे दोन महान खेळाडू दुसऱ्या फेरीतच एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे.

नोवाक जोकोविच याने अद्याप ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेले नाही. सलामीच्या लढतीत तो ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन याचा सामना करील. तसेच, २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या राफेल नदालला हंगेरीच्या मार्टोन फुकसोविक्स याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

रोलँड गॅरो येथील लाल मातीवर या लढती होणार आहेत. २७ जुलै ते ४ ऑगस्ट यादरम्यान टेनिस या खेळाची स्पर्धा रंगेल. येथेच राफेल नदालने १४वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावले हे विशेष.

अशा उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगण्याची शक्यता

  • नोवाक जोकोविच - स्टेफानोस त्सिस्तिपास

  • ॲलेक्झँडर झ्वेरेव - टेलर फ्रिट्‌झ

  • डॅनिल मेदवेदेव - कॅस्पर रुड

  • कार्लोस अल्काराझ - ॲलेक्स दी मिनॉर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT