ravi dahiya sakal
क्रीडा

तीस सेकंदाच्या ब्रेकचा रवि दहियाला फटका

दोघांतील गेल्या लढतीत रवी ३-६ पराजित झाला होता, या वेळचा फरक जास्त दिसत असला तरी रवीने कुस्ती चांगली केली होती. रवीचे प्रतिआक्रमण ब्रेक घेत रोखत उगुएव पुढे सरकला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेणे रवीला जमले नाही

सकाळ वृत्तसेवा

-अमोल बुचडे (महाराष्ट्र केसरी)

उगुएव रवीची आक्रमणे रोखण्यात यशस्वी ठरला, त्या वेळीच रवीची बाजू कमकुवत झाली. उपांत्य फेरीत सात गुणांची पिछाडी असूनही रवीला त्याचा खेळ करता आला. प्रतिस्पर्ध्याला दमवणे, त्यानंतर ताकदीने आक्रमण करणे ही रवीची खासियत आहे. हे साध्य केल्यामुळे तो उपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यास चीत करू शकला. नेमके हेच करण्यापासून उगुएवने रवीला रोखले, विशेषतः बगलडू हा डाव करण्यापासून त्याने रवीला रोखले. रवीचा खेळ नक्कीच चांगला झाला.

रशियाचे कुस्तीगीर लढतीची आखणी करण्यात कायम आपल्यापेक्षा सरस ठरतात, त्यामुळेच तो हरला; अन्यथा त्याची या लढतीतील कामगिरीची सर्वोत्तम लढतीत नक्कीच गणना करता येईल. त्याने पूर्ण ताकद लावली. रवीच्या व्यूहरचनेस उगुएवने कसा धक्का दिला त्याचे एक उदाहरण देतो. दुसऱ्या फेरीत त्याने घेतलेला ब्रेक महत्त्वाचा होता. रवी प्रतिस्पर्ध्याला दमवून हरवतो. त्याने रवीला यापासून रोखण्यासाठी मेडिकल ब्रेक घेतला. या रिकव्हरीमुळे तो फ्रेश झाला. त्यानंतर उगुएवने चांगला बचाव केला. त्यामुळे रवीच्या खेळाची लयही गेली.

दोघांतील गेल्या लढतीत रवी ३-६ पराजित झाला होता, या वेळचा फरक जास्त दिसत असला तरी रवीने कुस्ती चांगली केली होती. रवीचे प्रतिआक्रमण ब्रेक घेत रोखत उगुएव पुढे सरकला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेणे रवीला जमले नाही. प्रतिस्पर्ध्यास दमवत, टिकू न देण्याची रवीची खासियत त्याला साध्य होणार नाही, हेच उगुएवने साधले आणि तो जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT