PV Sindhu And  Anand Mahindra
PV Sindhu And Anand Mahindra  E sakal
क्रीडा

सिंधूला अलिशान कार द्या; आनंद महिंद्रा यांनी दिला खास रिप्लाय

सुशांत जाधव

भारताची स्टार बॅडमिंटनपूट पीव्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात दुसरे पदक जमा केले. दडपणात दिमाखदार कामगिरीसह भारताच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरलीये. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या सिंधूने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदाची कमाई केली होती. यावेळी ती रौप्य पदकाचे सुवर्ण पदकात रुपांतर करेल, असे वाटत होते. पण सेमीफायनलमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला आणि ती कांस्य पदकासाठी पुन्हा कोर्टवर उतरली. चीनच्या बींगजिओचा सरळसेटमध्ये पराभव केला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूवर कौतुकाचा वर्षाव सुरु झालाय.

सिंधूच्या या यशानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्विट चर्चेत आहे. एका नेटकऱ्याने आनंद महिंद्रा यांच्याकडे सिंधूसाठी खास मागणी केली होती. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जशी थार कार बक्षीस देण्यात आली तशीच अलिशान कार सिंधूलाही बक्षीस रुपात द्यावी अशी मागणी नेटकऱ्याने केली होती. ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूचे अभिनंदन करताना या नेटकऱ्याने उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला महिंद्रा थार भेट द्यायला पाहिजे, असे ट्विट केले. ट्विट करताना त्याने आनंद महिंद्रा आणि पीव्ही सिंधू यांना टॅगही केले होते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रा यांनी यावर उत्तर दिले आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय. सिंधूच्या गॅरेजमध्ये एक थार आधीच पार्क असल्याचे त्यांनी सांगितलंय. 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन पदके मिळाली होती. पीव्ही सिंधूने रौप्य तर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवले होते. त्यावेळी आनंद महिंद्रा यांनी दोघींना अलिशान काल बक्षीस स्वरुपात दिली होती.

सिंधूच्या कामगिरीच कौतुक करताना आनंद महिंद्रा यांनी तिला गोल्डन गर्लची उपमा दिलीये. मानसिक क्षमता सिद्ध करण्यासाठी एखादी ऑलिम्पिक स्पर्धा असती तर सिंधू त्यात सर्वोच्च ठरली असती. एका पराभवानंतर कांस्य पदकासाठी खेळणं खूप कठी ण असते. पराभवातून सावरत किती मानसिकतेने ती कांस्य पदकाच्या लढतीत उतरली असेल, अशा शब्दांत आनंद महिंद्रांनी सिंधूचे कौतुक केले आहे. कांस्य पदक जिंकणाऱ्या सिंधू आमच्यासाठी गोल्डन गर्लच आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT