India Mens Hockey Team
India Mens Hockey Team John Locher
क्रीडा

VIDEO: हॉकीतील ऐतिहासिक क्षण; कॉमेंटेटरलाही अश्रू अनावर

सुशांत जाधव

Tokyo Olympics Indian Hockey : ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरीसह सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. पुरुष संघ 1972 नंतर पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचलाय. दुसरीकडे महिला हॉकीसंघानेही आपल्यातील क्षमता दाखवून देत पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडाकेबाजी एन्ट्री मारलीये. पुरुष हॉकी संघाने रविवारी झालेल्या क्वार्टर फायनलच्या लढतीत ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय.

दुसरीकडे सोमवारी भारतीय महिला संघाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला 1-0 असे पराभूत करत नवा इतिहास रचला. पुरुष आणि महिला संघाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुन्हा एकदा हॉकीला अच्छे दिन आल्याचे संकेत मिळाले आहेत. सोशल मीडियावर राष्ट्रीय खेळ ट्रेंडिगमध्ये आलाय.

भारतीय हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना काही भावनिक क्षणाचीही अनुभूती पाहायला मिळत आहे. सोनी टीव्हीवर हिंदीमध्ये सामन्याचे समालोचन (Commentary) करत असाताना सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय या दोघांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील सामना संपल्याची रेफ्रींनी शिट्टी वाजवताच कॉमेंट्री करत असलेल्या सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांड्ये यांचा आनंद अश्रूंचा बांध फुटला. सोशल मीडियावर भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या जोडीला कॉमेंट्रीचा दांडगा अनुभव आहे. दोघांनी अनेक ऐतिहासिक सामन्यात कॉमेंट्री केलीये. पण भारतीय संघाने रविवारी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ही जोडी चांगलीच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लाखो भारतीयांना आनंद देणाऱ्या या क्षणी Live प्रेक्षपणाचे समालोचन करताना ते भावूक झाले. आनंद अश्रू अनावर झाल्याचा या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय पुरुष संघाचा साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7-1 असा धुव्वा उडवला होता. रविवारीच भारतीय संघाला हा नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत भारतीय पुरुष संघाने दिमाखात कमबॅक केले. रविवारी ग्रेट ब्रिटनला शह देत भारतीय संघ 41 वर्षानंतर ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहचलाय. पुरुष संघासमोर आता सेमीफायनलमध्ये बेल्जियमचे आव्हान असणार आहे. त्यांना थोपवून टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघाने मंगळवारी विजय मिळवला तर भारताचे पदक निश्चित होईल. पदक निश्चित करण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाचा पुरुष आणि महिला हॉकी पाठोपाठ आगेकूच करताना पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT