क्रीडा

Olympics : गोल्फमध्ये आदिती गोल्डच्या शर्यतीत

गोल्फ क्रीडा प्रकारात अमेरिकेची कोरडा नेली अव्वलस्थानावर आहे. भारतीय खेळाडू अवघ्या तीन स्ट्रोकने तिच्या मागे आहे.

सुशांत जाधव

Tokyo Olympics टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय गोल्फर अदिती अशोक (Aditi Ashok) ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शुक्रवारी तिसरा राउंड संपल्यानंतर 23 वर्षीय गोल्फर दुसऱ्या स्थानावर होती. गोल्फ क्रीडा प्रकारात अमेरिकेची कोरडा नेली अव्वलस्थानावर आहे. भारतीय खेळाडू अवघ्या तीन स्ट्रोकने तिच्या मागे आहे.

अमेरिकन महिला गोल्फर -15 पहिल्या तर अदिति अशोक -12 स्ट्रोकसह दुसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या राउंडमध्ये तिने कामगिरीत सातत्य राखले तर आता गोल्फमध्येही भारताला पदकाची आस निर्माण झालीये. शनिवारी चौथ्या आणि अखेरच्या राउंडमध्ये ती कशी कामगिरी करतेय, हे पाहणे महत्वाचे ठरेल. अदिती अशोक सुवर्ण पदकाच्या शर्यतीत अमेरिकन गोल्फरला फाइट देताना दिसत आहे.

आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासामध्ये भारताला वैयक्तिक गटात एकमेव सुवर्ण पदक मिळाले आहे. अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये गोल्डन कामगिरी केली होती. अदिताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी खुणावताना दिसते. ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरुवातीला गोल्फमध्ये पदकाची आशा कुणीच बाळगली नव्हती. पण अदितीने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय.

गोल्फमध्ये न्यूझीलंडची को लीडिया -10 ऑस्ट्रेलियाची ग्रीन हॅना -10, डेन्मार्कची पेडरसेन इमीली क्रिस्टिन -10 आणि जपानची इनामी मोन -10 समान स्ट्रोकसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. अदिती अशोक शिवाय भारताची दिक्षा डागही या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. ती दोन स्थानांच्या सुधारणेसह 51 व्या क्रमांकावर आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या खात्यात 5 पदके जमा झाली आहेत. अखेरच्या टप्प्यात कुस्तीमध्ये बजरंग पुनिया आणि भालाफेक क्रिडा प्रकारात नीरज चोप्रासह आता अदिती अशोककडून पदकाची आस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT