U19 Asia Cup 2021 India vs Pakistan esakal
क्रीडा

आज भारत - पाकिस्तान भिडणार, वाचा कुठे बघायचा लाईव्ह सामना

U19 Asia Cup 2021 : आज भारत - पाकिस्तान भिडणार, वाचा कुठे बघायचा लाईव्ह सामना

अनिरुद्ध संकपाळ

युएईमध्ये १९ वर्षाखालील आशिया कपला (U19 Asia Cup 2021) २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तीन सामने खेळवले गेले. स्पर्धेची सुरुवात भारत आणि युएई यांच्या सामन्याने सुरुवात झाली. आज हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान (India vs Pakistan) सामना होणार आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाने टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करत इतिहास रचला होता. आता या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी १९ वर्षाखालील भारतीय संघाकडे आहे. आज भारत आणि पाकिस्तान 9.30 वाजता दुबईत भिडणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ अ गटात आहेत. या गटात भारत, युएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या ब गटात श्रीलंका, कुवेत, बांगलादेश आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे. आशिया कप २०२१ ची ३१ डिसेंबरला दुबईत रंगणार आहे.

१९ वर्षाखाली आशिया कप २०२१ (U19 Asia Cup 2021) मध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. दोन्ही गटातील संघ एकमेकांबरोबर खेळणार असून गटातील दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होती. त्यानंतर अ गटातील क्रमांक १ चा संघ ब गटातील क्रमांक २ च्या संघाबरोबर खेळणार आहे. तर ब गटातील क्रमांक एकचा संघ अ गटातील क्रमांक २ च्या संघाबरोबर खेळेल.

भारताने आशिया कपमधील आपला युएईबरोबरचा पहिला सामना तब्बल १५४ धावांनी जिंकला. भारताकडून हरनूर सिंगने (Harnoor Singh) दमदार शतकी (१२०) खेळी केली. त्याला कर्णधार यश धूलने (Yash Dhull) ६३ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. यानंतर राजवर्धन हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) २३ चेंडूत नाबाद ४८ धावांची आक्रमक खेळी करत युएई समोर २८२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

युएईला भारताचे हे मोठे लक्ष्य पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १२८ धावात तंबूत परतला. भरताकडून राजवर्धन हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याला गर्व सांगवान, विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगली साथ दिली. पाकिस्ताननेही अफगाणिस्तानचा ४ विकेट्सनी पराभव करत आशिया कपची विजयाने सुरुवात केली.

१९ वर्षाखालील आशिया कपमध्ये जरी भारत पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार असला तरी तो कोणत्याही क्रीडा वाहिनीवर प्रक्षेपित होणार नाही.१९ वर्षाखालील आशिया कपचा फक्त अंतिम सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित होणार आहे. मात्र चाहत्यांना बाकीच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या (Asia Cricket Council) अधिकृत फेसबूक पेज आणि युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT