U19 World Cup Indian Left Arm Fast Bowler Ravi Kumar Reminds Legend Zaheer Khan
U19 World Cup Indian Left Arm Fast Bowler Ravi Kumar Reminds Legend Zaheer Khan esakal
क्रीडा

Video: U19 मधला 'जहीर खान', बांगलादेशची उडवली टॉप ऑर्डर

अनिरुद्ध संकपाळ

अँटिग्वा : वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप (ICC Under 19 Cricket World Cup ) स्पर्धेत उपांत्यापूर्व फेरीतील सामन्यात भारताने (India) गतविजेत्या बांगलादेशचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत बांगलादेशला १११ धावात रोखले. भारताकडून (India national cricket team) डावखुऱ्या रवी कुमारने (Ravi Kumar) अप्रतिम मारा करत पॉवर प्लेमध्येच बांगलादेशी फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या सुरेख स्विंग गोलंदाजीचा (Left Arm In Swing Bowling) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची गोलंदाजी पाहून भारताचा दिग्गज डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खानची (Zaheer Khan) आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. (U19 World Cup Indian Left Arm Fast Bowler Ravi Kumar Reminds Legend Zaheer Khan)

भारताचा कर्णधार यश धूलने (Yash Dhul) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसरेच षटक टाकण्यासाठी आलेल्या रवी कुमारने आपल्या पहिल्या षटकापासूनच बांगलादेशला धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने दुसऱ्याच षटकात महफिजुल इस्लामला (Mahfijul Islam) २ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर सहाव्या षटकात इफ्तकार हुसैनला १ आणि आठव्या षटकात प्रांतिक नाबिलला ७ धावांवर बाद करत बांगलादेशची अवस्था ३ बाद १४ धावा अशी करून टाकली. रवी कुमारच्या या भेदक गोलंदाजीमुळेच भारत बांगलादेशला १११ धावात रोखू शकले.

याच रवी कुमारने महफिजुल इस्लामचा एका अप्रतिम इन स्विंगवर उडवलेल्या त्रिफळ्याचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आयसीसीने (ICC) देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. इथूनच भारताने बांगलादेशच्या फलंदाजीला भगदाड पाडायला सुरूवात केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT