Big Bash League Big Bash League
क्रीडा

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी खेळणार!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उन्मुक्त चंद हे नाव सर्वांच्या लक्षात असेलच. कारण, उन्मुक्तने भारताला २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिले होते. त्यावेळी तो प्रतिभावान खेळाडू असल्याचे बोलले जात होते. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळेल अशी सर्वांना आशा होती. मात्र, तसे काही झाले नाही. उलट ऑगस्टमध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली होती.

उन्मुक्त चंदच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अगदी दणक्यात झाली. परंतु, तितक्याच वेगाने तो मागेही आला. भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतरही त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळेच त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, तो आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

उन्मुक्तने अमेरिकन लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीचे चांगले फळ मिळाले आहे. त्याला आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तो ॲरोन फिंचच्या मेलबर्न रेनेगेडस संघातून खेळताना दिसणार आहे. याची माहिती फ्रेंचाइजीने ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

उन्मुक्त चंदची तुलना भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत केली जात होती. परंतु, विश्वचषक मिळवून देण्यापलीकडे तो भारतासाठी काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने आयपीएलमध्येही करिअर घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही त्याला यश आले नाही. उन्मुक्त चंदने दिल्ली, मुंबई आणि राजस्थान या तीन संघातून खेळला होता. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर उन्मुक्त चंद बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटर ठरला आहे. मेलबर्न संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे उन्मुक्त चंदने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT