Urvashi Rautela Reveal First Meeting With Rishabh Pant In Delhi Video Viral  esakal
क्रीडा

VIDEO | Urvashi Rautela : उर्वशीने 'RP' सोबतचा दिल्लीतील 'तो' किस्सा सांगून उडवली खळबळ

अनिरुद्ध संकपाळ

Urvashi Rautela Rishabh Pant Video : जागतिक क्रिकेट वर्तुळात ऋषभ पंत (Rishabh Pant) हळूहळू आपला दबदबा निर्माण करत आहे. ऋषभ पंत आपल्या डॅशिंग बॅटिंगने सर्वांचा लाडका झाला आहे. अशा या लाडक्या ऋषभ पंतचे नाव सातत्याने उर्वशी रौतेला या मॉडेलशी जोडले जाते. ऋषभ पंतने कधीही उर्वशी रौतेलासोबतच्या लिंकअप (Linkup) बाबत जाहीररित्या वक्तव्य केलेले नाही. मात्र उर्वशी रौतेला सातत्याने ऋषभ पंतबाबतच्या पोस्टवरून चर्चेत असते. दरम्यान, उर्वशी रौतेलाने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत एक वेगळाच दावा केला आहे.

उर्वशी रौतेला या व्हिडिओत ऋषभ पंतचे थेट नाव घेत नाही. मात्र ती सातत्याने आरपी आरपी असे म्हणते. मात्र सर्वजण आरपी म्हणजे ऋषभ पंत असा अर्थ लावत आहेत. या व्हिडिओत उर्वशी रौतेलाने आरपी सोबतच्या दिल्लीतील भेटीचा किस्सा सांगितला. या व्हिडिओत तिने आरपी माझी दिल्लीतील हॉटेल लॉबीत भेटण्यासाठी वाट पाहत होता. मात्र मी शुटिंगमध्ये व्यग्र होते. नंतर मी थकून झोपले. मात्र मला 16 ते 17 मिसकॉल आले होते. आरपी अनेक तास माझी वाट पाहत होता मात्र मी त्याला भेटू शकले नाही यामुळे मी नाराज होते. त्यानंतर मी त्याला मुंबईत भेटू असे सांगितले. आम्ही मुंबईत भेटलो. मात्र या दरम्यान माध्यमांनी आम्हाला गाठले. त्यानंतर आमचे नाते संपले असेही ती म्हणाली.

ऋषभ पंत सध्या इशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. नवी दिल्ली राहणारी इशा नेगी इंडिरियर डिझायनर आहे. पंत आशिया कपसाठी तयारी करत आहे. आशिया कप येत्या 27 ऑगस्टपासून युएईमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा आशिया कपमधील पहिला सामना हा 28 ऑगस्टला दुबईत पाकिस्तानविरूद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT