FIFA Women's World Cup : गतविजेत्या अमेरिकन महिला फुटबॉल संघाला रविवारी धक्का बसला. स्वीडनच्या महिला फुटबॉल संघाने अमेरिकन संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा थरारक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना जपानच्या महिला फुटबॉल संघाशी होणार आहे.
स्वीडन-अमेरिका यांच्यामध्ये निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली. त्यानंतर जादा वेळेतही गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. स्पेनकडून फ्रिडोलिनो रोल्फो, एलिन रुबेनसन, हना बेनिसन, एम. इरिक्सन आणि लिना हर्टिग यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये शानदार गोल केले.
अमेरिकन संघाकडून अँडी सुलीवन, लिंडसे होरान, ख्रिस्तन मेविस व एलिसा नाहेर यांना गोल करता आले. याआधी दोन देशांमध्ये पाच सामने झाले होते. स्वीडनने तीन सामने जिंकत वर्चस्व राखले होते. अमेरिकेला फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आला होता. तसेच दोन देशांमधील एक लढत बरोबरीत राहिली होती.
गोलरक्षक मुसोविचचा अभेद्य बचाव
स्वीडनने या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवला. स्वीडनच्या या विजयात गोलरक्षक झेसिरा मुसोविच हिचा मोलाचा वाटा आहे. तिने या लढतीत ११ वेळा गोल होण्यापासून रोखले. अमेरिकचे आक्रमण तिने लीलया थोपवून लावले.
नेदरलँडचीही आगेकूच
नेदरलँडच्या महिला फुटबॉल संघानेही महिलांच्या फुटबॉल विश्वकरंडकात आगेकूच केली. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला २-० असे पराभूत केले आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जिल रुर्ड हिने ९ व्या मिनिटाला आणि लिनेथ बिरेनस्टेन हिने ६८ व्या मिनिटाला गोल करीत नेदरलँडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता नेदरलँडसमोर अंतिम आठ फेरीच्या लढतीत स्पेनचे आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.