क्रीडा

'फादर्स डे'ला बोल्टची गोड बातमी; दुसऱ्यांदा बाप

नामदेव कुंभार

'फादर्स डे'चं औचित्य साधत क्रीडा विश्‍वातील महान धावपटू उसेन बोल्ट यानं आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. उसेन बोल्ट दुसऱ्यांदा बाप बनला आहे. पत्नी केसी बेनेटने जुळ्यांना जन्म दिला आहे. बोल्टनं आपल्या मुलांची नावं खूपच खास ठेवली आहेत. बोल्टनं जुळ्यांची नावं थंडर बोल्ट आणि सेंट लियो बोल्ट अशी ठेवली आहेत. तर गेल्यावर्षी झालेल्या मुलीचं नाव ऑलंपिया लायटनिंग बोल्ट असं ठेवलं होतं.

उसेन बोल्टनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जुळ्या मुलांची माहिती दिली आहे. जुळ्या मुलांचा जन्म केव्हा झाला याबाबतची कोणतीही माहिती बोल्ट दाम्पत्यांकडून देण्यात आलेली नाही. मात्र, 'फादर्स डे'चं औचित्य साधत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. बोल्टच्या तिन्ही मुलांची नावं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

ऑलंपिया लायटनिंग बोल्टचा जन्म मे 2020 मध्ये झाला होता. 34 वर्षीय उसेन बोल्टनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा पिता झाल्याची माहिती दिली आहे. केसी बेनेट आणि उसेन बोल्ट यांनी आपल्या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव करत अभिनंद केलं आहे.

34 वर्षीय उसेन बोल्टने ऑलिंपिक गेम्समध्ये आठ वेळा सुवर्णपद जिंकलं आहे. 100 आणि 200 मीटर स्पर्धेत उसेन बोल्टने विश्वविक्रम केला आहे. जवळपास दशकभर उसेन बोल्टचा दबदबा होता. 2017 मध्ये बोल्टने सन्यास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT