Sports Person Love Story Sakal
क्रीडा

क्रिकेटरनं प्रेमाचा स्ट्रोक खेळला; पण तिला काडीचाही रस नव्हता

सकाळ डिजिटल टीम

तो लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटमधील खेळाडू आणि ती क्रिकेटमुळे दुर्लक्षित राहिलेल्या खेळात भारताला पदक जिंकून देणारी रणरागिणी. क्रिकेटला मिळणाऱ्या अमाप प्रसिद्धीमुळे आपला खेळ झाकोळला जातोय या भावनेतून तिच्या मनात क्रिकेट आणि क्रिकेटर्सच्याबाबत तिरस्कार निर्माण झाला होता. त्यामुळे ती आणि तो एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्याने तिच्यावर प्रेम करण्यास सुरुवात केली. तिला मात्र त्याच्यात काडीचाही रस नव्हता. त्यामुळे दोघांमधील प्रेम फुलेल आणि ते बहरेल असा विचारही कोणी करु शकत नव्हते. पण हा प्रेमाचा सामना रंगला आणि क्रिकेटरनं तिच मन जिंकलही.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि त्याची पत्नी आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल (Deepika Pallikal) यांची प्रेम कहाणी (Love Story )खूपच रंजक आहे. दीपिकाने एका मुलाखतीमध्ये क्रिकेटर्स आणि क्रिकेट आवडत नाही, असा किस्सा शेअर केला होता. विशेष म्हणजे तिचे आई आणि वडील दोघेही उत्तम क्रिकेटर होते.

दीपिका पल्लीकल (Dinesh Karthik) हिने एका मुलाखतीमध्ये क्रिकेटर्स आणि क्रिकेट यासंदर्भात मोकळ्या मनानं गप्पा मारल्या होत्या. ती म्हणाली होती की, मी माझ्या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करायचे. पण माझे नाव कधीच चर्चेत आले नाही. वर्तमान पत्र उघडले की क्रिकेट आणि क्रिकेट असे चित्र पाहायला मिळायचे. या गोष्टीचा राग यायचा. त्यामुळे क्रिकेट आणि क्रिकेटर्सविषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्याचा किस्सा तिने शेअर केला होता.

पण तिने 18 ऑगस्ट 2015 मध्ये टीम इंडियातील विकेट किपर फलंदाज दिनेश कार्तिकशी तिने लग्न केल. कार्तिकची ती दुसरी पत्नी आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकानं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दोघांचा संसार गुण्या गोविंदानं सुरु आहे. दीपिकानं दिनेशसोबतच्या प्रेम कहाणीला मुलाखतीमध्ये उजाळा दिला होती. ती म्हणाली होती की, माझी आई आणि दिनेशची आई एकमेकींच्या मैत्रीणी होत्या. एक दिवस दिनेशनं मला मेसेज करुन डिनरला बोलवलं. बाहेर जाणार असल्याचे सांगत यावेळी त्याला टाळलं. पुन्हा त्याने बाहेर जाण्याची विचारणा केली. तो पाठलाग करणं सोडून देईन या उद्देशाने मी त्याला होकार दिला. पण त्यानंतर तो माझ्यासोबत इंग्लंडलाही आला. इथून आमच्या प्रेमाला सुरुवात झाली, असे दीपिकाने सांगितले होते.

दिनेश कार्तिकनं क्रिकेट करियर आणि आयुष्यात खूप चढउताराचा सामना कले आहे. धोनीसमोर तो फिका ठरला आणि त्याला संघात अधिकाधिक संधी मिळाली नाही. भारतीय संघातून आत बाहेर असा प्रवास सुरु असताना त्याला पहिल्या पत्नीने धक्का दिला होता. निकिता वंजाराने दिनेश कार्तिकला सोडून त्याचाच सहकारी मुरली विजयशी लग्न केले होते. दीपिका पल्लीकलने 2014 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दीपिकाने स्क्वॅश क्रिडा प्रकारातील दुहेरी भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतही दीपिकानं पदकांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT