क्रीडा

विराटला विश्रांती देण्यावर व्यंकटेश प्रसाद BCCI वर संतापले, म्हणाले...

धनश्री ओतारी

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता, तेव्हा तुमची प्रतिष्ठा काय आहे हे जाणून न घेता तुम्हाला संघातून बाहेर करण्यात येते. सध्या फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येत असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले आहे. सध्या खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीवर व्यंकटेश प्रसादांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.(Venkatesh Prasad questions BCCI's decision to rest out of form batters)

काय म्हटले आहे व्यंकटेश प्रसादांनी ट्विटमध्ये?

एक काळ असा होता जेव्हा तुम्ही आउट ऑफ फॉर्म होता, तुमच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता तुम्ही बाहेर करण्यात येते. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान आणि हरभजन सिंग यांसारखे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यामुळे वगळण्यात आले. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतले, धावा केल्या आणि पुन्हा टीम इंडिया फॉर्मात आली.

असे वाटत आहे की, नियमात काही बदल केले आहेत. जिथे आउट ऑफ फॉर्म होतो तिथे विश्रांती देण्यात येते. हा काय कोणत्या प्रगतीचा रस्ता नाही. देशात इतकी प्रतिभा आहे की तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेशी खेळू शकत नाही. भारताच्या महान मॅच-विनर्सपैकी एक, अनिल कुंबळे अनेक प्रसंगी बाहेर बसले. काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी कृती आवश्यक असते.

अशा शब्दात व्यंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआयसह संघ व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले आहेत.

इंग्लंडपूर्वी साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी २० सीरीज दरम्यान विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तो आता वेस्टइंडीजविरुद्ध देखील खेळताना दिसणार नाही. विराटला विश्रांतीसाठी सुट्टी देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमिवर व्यंकटेश प्रसादांनी ट्विट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT