Virat Kohli Teammate Siddarth Kaul Statement
Virat Kohli Teammate Siddarth Kaul Statement  ESAKAL
क्रीडा

तीन वेळा 5 विकेट, हॅट्ट्रिक तरीही दुर्लक्ष; विराटच्या संघातील खेळाडूची खंत

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) बेंच स्ट्रेंथ सध्याच्या घडीला सर्वात तगडी बेंच स्ट्रेंथ म्हणून गणली जाते. भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. पण, संघ 11 खेळाडूंचाच असल्याने अनेकांना संधी मिळत नाही. बीसीसीआयच्या रोटेशन (BCCI Rotation Policy) पॉलिसीमुळे थोड्या अंतराने का होईना या दर्जेदार खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. मात्र विराट कोहलीबरोबर दीर्घकाळ खेळलेल्या एका गोलंदाजाने तुम्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये कितीही चांगली कामगिरी करा तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही अशी खंत व्यक्त केली. (Virat Kohli Teammate Siddarth Kaul Statement)

विराट कोहलीने (Virat Kohli) 2008 मध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल (Siddarth Kaul) देखील या संघात होता. विराट कोहली त्यानंतर स्टार झाला. सिद्धार्थ कौलला देखील भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीचा लाभ मिळाला नाही. 2018 ला इंग्लंड दौऱ्यावर सिद्धार्थ कौलला देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) पोत्याने विकेट काढल्यानंतर संधी मिळाली. मात्र तो तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यानंतर भारतीय संघात पुन्हा दिसला नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांची पुढची पिढी राष्ट्रीय संघात खेळू लागली.

याबाबत स्पोर्ट्स यारीशी बोलताना सिद्धार्थ कौल म्हणाला की, आयपीएल कायम प्रकाशझोतात असते. त्या तुलनेत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना कमी प्रसिद्धी मिळते. याचा परिणाम असा होतो की देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक चांगली कामगिरी करणारे खेळाडू दुर्लक्षित होतात.

सिद्धार्थ पुढे म्हणाला, 'काही खेळाडू आयपीएल खेळत नाहीत त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा (Domestic Cricket) हा निवडीचा एक निकष असला पाहिजे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही दर्जेदार कामगिरी होतात. मात्र त्यांना कोणत्याही दौऱ्यात संधी मिळत नाही. मी सध्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत आहे. जर तुम्ही माझी गेल्या वर्षात केलेली कामगिरी पाहिली तर तुम्हाला कळेल की मी पाच सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. त्यातील 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या आणि यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. मी दोन वेळा पाच विकेट या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर घेतल्या आहेत. तर एकदा ग्रीन टॉपवर 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तरीही माझ्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मी साधा भारतीय अ संघात देखील निवडलो गेलो नाही.' सिद्धार्थ कौलला आरसीबीने आयपीएल 2022 लिलावात खरेदी केले आहे.

सिद्धार्थ सांगतो की, 'माझं काम हे कामगिरी करणं हे आहे. मी जर हे केले तर समाधानी असेन की मी कामगिरी केली. निवड करणं न करणं हे निवडसमितीच्या हातात आहे. मी माझं काम केलं याच्यातच मी आनंदी आहे. जर मी कामगिरीच केली नाही आणि टीका करू लागलो तर ते वेड्यासारखे आहे. मी कामगिरी करत राहणार आहे कारण याच्या जोरावरच मी भारतीय संघात स्थान मिळवं होतं.'

'मला कोणताही गॉडफादर (Godfather) नाही. कोणताही हितचिंतक नाही. कोणीही माझ्यासाठी बघा सिद्धार्थ कौल कामगिरी करत आहे असं म्हणत नाही. माझी कोठेचं हवा नाही. मी कामगिरी केली मगच माझी निवड इंग्लंड दौऱ्यासाठी झाली होती.' असे म्हणत सिद्धार्थने बीसीसीआयमध्ये आपला कोणी गॉडफादर नाही असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT