Virat Kohli And Ajinkya Rahane Twitter
क्रीडा

"मला विराटशी चर्चा करावीच लागेल"; बालपणीच्या कोचची प्रतिक्रिया

विराज भागवत

वाचा, नक्की कोणत्या मुद्द्यावरून कोच आहेत नाराज

Ind vs Eng Test: भारतीय संघाने (Team India) लॉर्ड्सच्या (Lord's) मैदानावर इंग्लंडचा (England) १५१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात विराटने (Virat Kohli) ४२ धावांची खेळी केली. गेल्या काही दिवसांपासून विराटची फलंदाजी (Virat's Batting) म्हणावी तशी बहरत नसल्याने चाहते आणि जाणकार चिंतेत आहेत. परिणामी, ताज्या कसोटी फलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही (ICC Test Rankings) विराट थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. याच साऱ्या गोष्टींमुळे विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Childhood Coach Rajkumar Sharma) यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली.

"विराटसारखा अतिशय दमदार प्रतीचा फलंदाज कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर जाणे ही खूपच धक्कादायक बाब आहे. जो रूट विराटच्या पुढे जाईल अशी मला शंका होती. पण सध्या तो पाचव्या क्रमांकावर गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. मला विराटशी बोलावंच लागेल", अशा शब्दात राजकुमार शर्मा यांनी विराटच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली. "विराटला प्रेरित किंवा प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण विराट कायमच उत्साही असतो. लॉर्ड्सच्या सामन्यानंतर विराटशी माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी विराट अतिशय आनंदी होता. तो संघ जिंकल्याच्या आनंदात असल्याने तो स्वत: फॉर्मबद्दल फारसा चिंतीत नव्हता. जेव्हा तो अशा प्रकारच्या अँटीट्यूटमध्ये असतो त्यावेळी तो लवकरच एक मोठी शतकी खेळण्याच्या मूडमध्ये असतो", असे शर्मा म्हणाले.

Virat-Kohli-Rajkumar-Sharma

इंग्लंड दौऱ्याच्या आधीपासूनच विराटचा फॉर्म फारसा चांगला नसल्याचे दिसत आहे. विराटने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात शून्य धावा केल्या. अगदी पहिल्याच चेंडूवर त्याला बाद व्हावे लागले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत विराटने ४२ धावांची झुंजार खेळी करून दाखवली, पण त्या खेळीचे अर्धशतकात रूपांतर करणं त्याला जमलं नाही. त्याच सामन्यात दुसऱ्या डावातदेखील त्याला २० धावांवर माघारी परतावं लागलं. विराट सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीवर परिणाम होत आहेच, पण त्याचसोबत भारतीय फॅन्सही विराटवर काहीसे नाखुश आहेत. अशा परिस्थितीत विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले त्याप्रमाणे विराटकडून एका बड्या खेळीची साऱ्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT