Virat Kohli Dropped Catches esakal
क्रीडा

Virat Kohli : अजिंक्य रहाणेच हवा होता! विराट कोहलीचे हे व्हर्जन पाहून...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Dropped Catches : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळण्यास सुरूवात केली होती. लंचपर्यंत भारत आपल्या या मोहिमेत अग्रेसर होता. भारताचे गोलंदाज देखील प्रभावी मारा करत होते. मात्र त्यांना क्षेत्ररक्षकांकडून साथ लाभत नव्हती. भारताने आज स्लिपमध्ये भरपूर झेल सोडले. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व झेल भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणाला जाणाऱ्या विराट कोहलीने सोडले.

विराट कोहलीने स्लिपमध्ये आज तब्बल 3 झेल सोडले. त्यातील दोन झेल हे बांगलादेशचा झुंजार फलंदाज लिटन दासचे होते. विराटची स्लिपमधील फिल्डिंग पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना आता अजिंक्य रहाणे हवा होता अशी भावना तयार झाली. अजिंक्य रहाणे कसोटीत स्लिपमध्ये फिल्डिंग करण्यात हातखंडा असलेला खेळाडू आहे. त्याने अनेक वर्षे भारताकडून कसोटीत स्लिपमध्ये उत्तम फिल्डिंग केली आहे.

1- विराट कोहलीने आजच्या सामन्यात पहिल्यांदा 44 व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लिटन दासला जीवनदान दिले. विराट झेल घेताना चेंडू कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाज बांधण्यात चुकला आणि भारताने विकेटची संधी गमावली.

2 - त्यानंतर विराटने 52 व्या षटकात पुन्हा अक्षर पटेलच्याच गोलंदाजीवर नरूल हसनचा झेल सोडला. चेंडू पंतच्या ग्लोजला लागून आल्याने विराट स्लिपमध्ये गोंधळा अन् झेल घेण्याची संधी दवडली गेली.

3 - विराट कोहलीने 59 व्या षटकात देखील स्लिपमध्ये एक चूक केली. अश्विनने लिटन दासला चकवा दिला होता. चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिपमध्ये गेला. मात्र वेगाने आलेला हा चेंडू विराट कोहलीने एका हाता पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. यानंतर विराटने अश्विनची झेल सोडल्यामुळे माफी देखील माघितली.

अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला 73 धावांवर बाद केले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव लगेच संपेल असे वाटले होते. मात्र टस्किन अहमदने फटकेबाजी करत बांगलादेशला 231 धावांपर्यंत पोहचवले. अखेर खलील अहमद 4 धावांवर धावबाद झाला अन् बांगलादेशचा डाव 231 धावांवर संपला. टस्किन अहमदने नाबाद 31 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे पेच निर्माण

Genelia: विलासराव देशमुखांच्या सुनेनं नॉनव्हेज का सोडलं? मुलाचा एक साधा प्रश्न अन् तिचं आयुष्य बदललं

ladki bahin yojana: 3 हजार रुपयाची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना धक्का! पैसे मिळणार पण किती? निवडणूक आयोगाने ठेवली मोठी अट

Latest Marathi News Live Update : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर यांचे प्रभावी शक्तिप्रदर्शन

Makar Sankranti 2026 : २३ वर्षांनंतर दुर्मिळ योग! मकरसंक्रांत आणि षट्‌तिला एकादशी एकाच दिवशी; जाणून घ्या महत्त्व

SCROLL FOR NEXT