virat kohli in 2022 test runs average drops most runs for india in test 2022
virat kohli in 2022 test runs average drops most runs for india in test 2022  
क्रीडा

Team India: बघतोयस काय रागानं मागं टाकलंय अश्विननं; फलंदाजीत विराटवर पडला भारी

Kiran Mahanavar

R Ashwin And Virat Kohli : टीम इंडियाने 2022 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. आता टीम इंडियाचे पुढील मिशन 2023 मध्ये सुरू होणार आहे, ज्याची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून होणार आहे. 2022 हे वर्ष पाहिलं तर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्‍ये खूप वाईट होते. स्थिती अशी आहे की रविचंद्रन अश्विनही धावांच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. (Team India News)

विराट कोहलीची फलंदाजी सरासरीमध्ये अवस्था खूपच वाईट झाली आहे. हे किंग कोहलीच्या चाहत्यांना या वर्षी नक्कीच विसरायला आवडेल. तसेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत 1, 19 आणि दुसऱ्या कसोटीत 24, 1 धावा केल्या.

2022 मध्ये विराट कोहलीची कामगिरी कशी होती?

  • 6 कसोटी, 11 डाव, 265 धावा, 26.50 सरासरी, 0 शतके, 1 अर्धशतक

  • 11 वनडे, 11 डाव, 302 धावा, 27.45 सरासरी, 1 शतक, 2 अर्धशतके

  • 20 टी-20, 20 डाव, 781 धावा, 55.78 सरासरी, 1 शतक, 8 अर्धशतके

2022 मध्ये भारतासाठी कसोटी सर्वाधिक धावा कोणी केल्या...

  • ऋषभ पंत - 680 धावा

  • श्रेयस अय्यर - 422 धावा

  • चेतेश्वर पुजारा - 409 धावा

  • रवींद्र जडेजा - 328 धावा

  • रविचंद्रन अश्विन - 270 धावा

  • विराट कोहली - 265 धावा

  • हनुमा विहारी - 215 धावा

  • शुभमन गिल - 178 धावा

  • केएल राहुल - 137 धावा

हे वर्ष विराट कोहलीसाठी कसोटीत चांगले गेले नसले तरी त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी केल्या. ज्यात विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळही संपला. विराट कोहलीला 2019 पासून एकही शतक झळकावता आलेले नाही, मात्र यावर्षी त्याने 2 शतके झळकावली. एक शतक बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात तर दुसरे शतक आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये झळकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT