Virat Kohli Is the Greatest Batsman of Our Times Sadhguru  sakal
क्रीडा

Virat Kohli : सदगुरुंनी केलं विराटचं कौतूक, त्याच्यात एक गोष्ट खास! ती म्हणजे...

विराटच्या या शानदार खेळीनंतर अचानक सद्गुरूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Kiran Mahanavar

Sadhguru on Virat Kohli : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहलीने भारतासाठी धमाकेदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीचे कौतुक होत असून संपूर्ण जग या खेळाडूला सलाम करत आहे. विराटच्या या शानदार खेळीनंतर अचानक सद्गुरूंचा 2016 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये संजीव गोयनका यांनी 26 मे 2016 रोजी सद्गुरूंना दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला होता. गोयनका यांनी विचारले होते की, विराट कोहली सतत उंचावर राहतो, मला त्याची उर्जा मैदानावर आणि मैदानाबाहेरही ते दिसते. विराटच्या आत काहीतरी आहे, जे त्याला इतरांपेक्षा जास्त प्रेरित करते. विराट कोहलीत हे काय आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना सद्गुरु म्हणतात, मीही विराट कोहलीला मोठ्या उत्सुकतेने पाहत आलो आहे. कारण मी गेल्या 40-45 वर्षात सर्व महान फलंदाज पाहिले आहेत. पण मला असे वाटते की तो एकमेव खेळाडू होता जो हा माणूस ज्या पद्धतीने चेंडू मारत असे. हे फार दुर्मिळ आहे. कदाचित मला आठवणारी दुसरी व्यक्ती म्हणजे व्हिव्हियन रिचर्ड्स आहे.

भारताने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा करत विनिंग इनिंग खेळली. विराटच्या टी 20 कारकिर्दितील हे सर्वोत्तम खेळी पैकी एक खेळी ठरली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT