Virat Kohli Praise Skipper Rohit Sharma esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट रोहितला म्हणतो, तू जी स्पेस मला दिलीस त्यामुळे...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Rohit Sharma : भारताने आशिया कपच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा चोपल्या. त्यात विराट कोहलीच्या 122 धावांचे योगदान मोठे होते. विराट कोहलीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी 20 शतक ठोकले. याचबरोबर गेल्या तीन साडेतीन वर्षापासून अडकलेले 71 वे शतक पूर्ण केले. यानंतर विराट कोहली खूप रिलॅक्स दिसला. (Virat Kohli Praise Skipper Rohit Sharma For Giving Him Space)

सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची मुलाखत घेतली. ही मुलाखत बीसीसीआयने आपल्या साईटवर शेअर केली आहे. या मुलाखतीत विराट कोहलीने अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. विराटने कर्णधार म्हणून रोहित शर्माने विराटबाबतीत जी भुमिका घेतली त्याचे कौतुक केले.

विराट कोहली मुलाखतीत म्हणला की, 'आपण आशिया कपमधील सुपर 4 सामन्यामधून शिकणार आहोत. या सामन्यात काय चुकले याची चिकित्सा केली जाईल. संघ व्यवस्थापनाकडून स्पष्टपणे सांगण्यात येते. तू जी स्पेस मला दिली त्यामुळे मी खूप रिलॅक्स झालो आहे. ज्यावेळी मी ब्रेक घेऊन संघात परत आलो त्यावेळी मी संघासाठी माझे योगदान देण्यासाठी उत्सुक होतो.'

विराट कोहली आपल्या पहिल्या वहिल्या टी 20 शतकाबाबत बोलताना म्हणाला की, रोहितबरोबर चर्चा करत असताना मी माझ्या जुन्या पद्धतीने खेळणार असल्याचे सांगितले. या पद्धतीत षटकार मारण्याला प्राधान्य नसते. विराट कोहली म्हणाला, 'मी चांगल्या क्रिकेटिंग शॉट्सवर भर दिला. मोठे षटकार मारणे ही माझी जमेची बाजू नाही. मी षटकार मारू शकतो मात्र ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच मी षटकार मारू शकतो. मात्र माझी ताकद ही गॅपमध्ये शॉट्स खेळणे ही आहे. मी जास्तीजास्त चौकार मारू शकतो. अशा पद्धतीने खेळून देखील आपण आपला हेतू साध्य करू शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT