Virat Kohli Ram Siya Ram Video esakal
क्रीडा

Virat Kohli : राम सिया राम गाण्यावर विराटनं काढला धनुष्य बाण; Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Ram Siya Ram Video : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात यजमानांचा डाव 55 धावात संपुष्टात आणला. पहिल्या कसोटीत दारूण पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी जोरदार पुनरागमन केलं. भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी जोर लावत आहे.

पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात केशव महाराज फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी स्टेडियममधील डीजेने राम सिया राम गाणं पुन्हा एकदा वाजवलं. त्यावर विराट कोहलीने भन्नाट प्रतिक्रिया दिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राम सिया राम गाणं वाजलं त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला विराट कोहलीने धनुष्य बाण पोज दिली. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सिराजच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ 55 धावात गारद झाला. सिराजने फक्त 15 धावात सहा बळी टिपले. त्याला जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. मुकेश कुमारने तर 2.2 षटकात एकही धाव न देता दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून बेडिंगहम (12) आणि वेरेयन्ने (15) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT