Wasim Akram Drug Addiction sakal
क्रीडा

Wasim Akram : दिग्गज क्रिकेटर्सचा मोठा खुलासा; ड्रग्जनं उद्ध्वस्त केलं 'आयुष्य', नंतर पत्नीचा...

वसीम अक्रमचा मोठा खुलासा, निवृत्तीनंतर होते कोकेनचे व्यसन

Kiran Mahanavar

Wasim Akram Drug Addiction : पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित अनेक कथांमध्ये मॅच फिक्सिंग, वयाच्या कागदपत्रांशी छेडछाड यासारख्या वाईट गोष्टींचा समावेश होता. अनेकवेळा या खेळावरही डाग लागला. आता या देशाच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आणि माजी कर्णधाराने आपल्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 56 वर्षीय वसीम अक्रमने सांगितले की, त्याला एकेकाळी ड्रग्जचे व्यसन लागले होते. एवढेच नाही तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली होती पण एका अपघाताने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने आत्मचरित्रात अनेक गुपिते उघड केली आहेत. एका खुलाशाने त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट समुदायाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका रिपोर्टनुसार, अक्रमने 'सुलतान ए मेमरी' या आत्मचरित्रात कोकेन आणि ड्रग्जच्या व्यसनाचा खुलासा केला आहे. त्याला एकेकाळी ड्रग्जचे व्यसन होते. या पुस्तकात त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

अक्रमने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये एका पार्टीदरम्यान कोकेनचे सेवन केले होते. अंमली पदार्थांच्या व्यसनाने अक्रमवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याच्या कारकिर्दीसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही याचा परिणाम होत होता. अक्रमने कबूल केले की एका क्षणी त्याला वाटू लागले की ड्रग्स घेतल्याशिवाय आपण जगू शकत नाही.

एका अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकल्याचे अक्रमने पुस्तकात सांगितले आहे. अक्रमने लिहिले की, पहिली पत्नी हुमाच्या मृत्यूने सर्व काही बदलले. यानंतर त्याने ठरवले की तो पुन्हा कधीही कोकेन घेणार नाही. त्यांनी लिहिलं आहे की, जेव्हा मी पार्ट्यांमध्ये राहायचो तेव्हा हुमा एकटीच असायची. तिला इंग्लंडहून कराचीला जायचे होते जेणेकरून ती तिच्या आई-वडिलांपासून दूर राहू शकेल पण मला ते नको होते.

अक्रम निवृत्तीनंतर आता कॉमेंट्री करतो. पाकिस्तानच्या महान गोलंदाजांमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 916 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1042 विकेट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth highway:'शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको'; सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा..

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Land Fraud: प्लॉट विक्रीतून ५८ लाखांची फसवणूक; पडेगाव येथील प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कसा असेल तुमचा वर्षअखेरीचा महिना? (१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५)

SCROLL FOR NEXT