Weightlifter Mirabai Chanu sakal
क्रीडा

Mirabai Chanu : ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई आशियाई चॅम्पियनशिपमध्ये बाहेर, जाणून घ्या कारण

विश्‍वकरंडकात खेळण्याचा विश्‍वास

Kiran Mahanavar

Weightlifter Mirabai Chanu : टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेला मुकणार आहे. दुखापतीमधून अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्यामुळे तिने पुढल्या वर्षी (२०२४) फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमधून माघार घेतली आहे; मात्र थायलंड येथे होणाऱ्या विश्‍वकरंडकात ती सहभागी होईल.

मीराबाई चानू ४९ किलो वजनी गटात सहभागी होते, पण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ती खेळणार नाही. याबाबत ती म्हणाली, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मी सहभागी होणार नाही. विश्‍वकरंडकात मात्र निश्‍चित खेळणार आहे. तसेच सध्या दुखापतीमधून बरी होत आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. फेब्रुवारीत मात्र डॉ. ॲरोन होर्सशिग यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी घेणार आहे.

नुकसान होणार नाही

मीराबाई चानू आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याच्या तिच्या आशांना सुरुंग लागेल अशी शक्यता निर्माण झाली होती, पण मीराबाई चानू हिची ऑलिंपिक पात्रता क्रमवारी ही चांगली आहे. ती दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी न झाल्याने तिचे नुकसान होणार नाही.

या स्पर्धांमध्ये सहभाग अनिवार्य

पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्यासाठी वेटलिफ्टर्सना काही स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य असणार आहे. ऑलिंपिकचे तिकीट बुक करण्यासाठी खेळाडूंना २०२३ मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, २०२४ मधील विश्‍वकरंडक, २०२२ मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, २०२३ व २०२४ मधील आंतरखंडीय स्पर्धा, २०२३ मधील ग्रँडप्रिक्स वन, ग्रँडप्रिक्स टू या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेच लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT