Pakistan National Cricket Team West Indies Tour Of Pakistan esakal
क्रीडा

आधी न्यूझीलंड आता विंडीजनेही पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडला

अनिरुद्ध संकपाळ

कराची : पाकिस्तानमधून दौरा अर्धवट सोडावा लागण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर असलेला वेस्ट इंडीजचा (West Indies) संघ आपला दौरा अर्धवट सोडून परतणार आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडनेही पाकिस्तानचा दौरा (West Indies Tour Of Pakistan) अर्धवट सोडला होता. त्यावेळी न्यूझीलंडने (New Zealand) सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमधून (Pakistan National Cricket Team) काढता पाय घेतला होता. मात्र वेस्ट इंडीजचा संघ एका पाठोपाठ एक खेळाडू कोरोनाग्रस्त (Coronavirus) होत असल्याने पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून जाणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan National Cricket Team) आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (West Indies Cricket Team) यांनी वेस्ट इंडीज संघातील आणखी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची मालिका आता जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. याची माहिती दोन्ही संघटनांनी संयुक्तरित्या वक्तव्य प्रसिद्ध करत दिली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) कोरोना प्रोटोकॉल नुसार गुरुवारी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. ज्यावेळी 15 वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली त्याचवेळी तिसरा टी 20 सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली. पण, यापूर्वीच वेस्ट इंडीज (West Indies) संघातील सहा खेळाडू कोरोना बाधित झाल्याने विंडीजकडे खेळाडूंची कमतरता भासू लागली. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात 'दोन्ही संघातील खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करता आणि वेस्ट इंडीजच्या संघाला खेळाडूंची कमतरता भासत असल्याने एकदिवसीय मालिका (ODI Series) स्थगित करण्यात येत आहे. ही मालिका आयसीसी पुरुष वर्ल्ड सुपर लीगचा भाग आहे. त्यामुळे ही स्पर्धा या वर्षाच्या जून महिन्यात पुन्हा खेळवली जाणार आहे.

ज्या खेळाडूंची तिसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी रॅपिड अँटीजेन टेस्ट (Rapid Antigen Tests) निगेटिव्ह आली आहे ते कराचीवरून तिसरा टी 20 सामना झाल्यानंतर वेस्ट इंडीजसाठी रवाना होतील. ज्या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे त्यांना कराचीतच पूर्णपणे विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT