Wrestling World Championships Sakal
क्रीडा

Wrestling World Championships : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवडणुकीनंतर निवड चाचणी

नव्या कार्यकारिणीवर आयोजनाची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रेंगाळल्यानंतर आता जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीवरून गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक येत्या १२ ऑगस्ट रोजी होणार असून त्यानंतर ही निवड चाचणी आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑलिंपिक समितीच्या ॲडहॉक समितीने आपली जबाबदारी झटकली असून त्यांच्याकडून ही जबाबदारी निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या नव्या कार्यकारिणीवर सोपवण्यात आली आहे.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन बेलग्रेड येथे १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक १२ ऑगस्टला होणार आहे. याचा अर्थ नव्या कार्यकारिणीला जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. हा अवधी कमी दिवसांचा असणार आहे.

विवाद होऊ नये म्हणून...

ॲडहॉक समितीकडून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बजरंग पुनिया व विनेश फोगाट या बृजभूषण शरण सिंह याच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे ॲडहॉक समितीवर टीका करण्यात आली होती. जागतिक कुस्ती निवड चाचणीवरून पुन्हा वाद होऊ नये यासाठी ॲडहॉक समितीकडून ही जबाबदारी नव्या कार्यकारिणीवर टाकण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : पुण्यात पोलिस अधिकाऱ्याला अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT